Fri, Mar 22, 2019 01:26
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › भारताचा इतिहास उज्ज्वल; पाश्‍चात्त्यांची नक्‍कल नको

भारताचा इतिहास उज्ज्वल; पाश्‍चात्त्यांची नक्‍कल नको

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:17AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

आपल्या देशास दीर्घकालीन इतिहासाची परंपरा आहे, अशावेळी देशवासीयांना अल्प इतिहास असलेल्या पाश्‍चात्त्य देशांची नक्‍कल करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव जयंतराव सहस्त्रबुद्धे यांनी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मळा येथे आयोजित हिंदू चेतना संगम कार्यक्रमात केले.

सहस्त्रबुद्धे म्हणाले, आपल्या देशास हजारो वर्षांची परंपरा आहे तशी परंपरा पाश्‍चात्त्य देशांना नाही. भारतावर पाश्‍चात्त्यांनी राज्य केले होते. या गुलामगिरीचा प्रभाव म्हणून काहींना आपल्या परंपरेचा विसर पडला आहे. गौरवशाली व श्रेष्ठ परंपरेचा विसर पडल्याने आपण गुलाम झालो. स्वातंत्र्य मिळाले तरी आपल्याला स्वत्व मिळालेले नाही. त्यामुळे आपण नेहमी पाश्‍चात्त्य संस्कृतीची नक्‍कल करतो. नक्‍कल करणारा नेहमी मागे राहतो. आपण सर्वांनी विलक्षण आकांक्षेच्या बळावर देशाला मोठे करायचे आहे. 

पाश्‍चात्त्य देशांच्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव आपल्यावर झाला आहे की आपल्याकडे विज्ञानाची पाळेमुळे आहेत, याचा आपल्याला विसर पडला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली.व्यासपीठावर डॉ. विशाल सावंत, राजू कुंडईकर व गोवा संघाचे संचालक लक्ष्मण बेहेरे उपस्थित होते.  कार्यक्रमास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती होती.