Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Goa › पुढील निवडणुकीनंतर ‘मगो’ च्या सरकारसाठी प्रयत्न

पुढील निवडणुकीनंतर ‘मगो’ च्या सरकारसाठी प्रयत्न

Published On: Mar 25 2018 1:47AM | Last Updated: Mar 25 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

गोवा शिवसेना पक्षाचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी  शनिवारी ‘मगो’ पक्षात प्रवेश केला असून पुढील निवडणुकीत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पणजीत  आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले.

ढवळीकर म्हणाले, की येत्या काही दिवसात आणखीन काही कार्यकर्ते व राजकीय नेते मगो पक्षात प्रवेश  करणार आहेत. ‘मगो’त प्रवेश केलेल्या 200 कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मगो’चा सर्व मतदारसंघांत  पक्ष विस्तार करण्यावर भर दिला जाईल. ज्या मतदारसंघातील कार्यकारिणीची पदे रिक्‍त आहेत त्यावर या कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाईल. पक्षाची ध्येय धोरणे पुढे नेत काम केले जाईल. ‘मगो’चे सध्या 27 मतदारसंघांमध्ये जोरदारपणे काम सुरु असून पुढील निवडणुकीत ‘मगो’चे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला जाणार  आहे. 21 जागा जिंकण्यावर मगोचा भर असणार आहे. 200 कार्यकर्त्यांचा प्रवेश ही त्याचीच सुरवात आहे. या कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी केले जाणार  असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवप्रसाद जोशी  म्हणाले, की मगो पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवण्यात  येईल  त्याचा पुरेपुर वापर करुन पक्ष सशक्‍त करण्यावर भर दिला जाईल. पक्षाशी एकनिष्ठ राहू अशी ग्वाही आपण देत असल्याचे ते म्हणाले. 

मगो पक्षाचे आमदार तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, आमदार दीपक पाऊसकर, माजी आमदार नरेश सावळ, मगोचे पदाधिकारी  नारायण सावंत, रत्नाकर म्हार्दोळकर  व अन्य नेते  उपस्थित होते.

Tags : goa,  next election, Mago try for governmen, says, Deepak Dhavalikar,