Sun, Nov 18, 2018 17:41



होमपेज › Goa › अपहृत चौघांची अखेर सुटका

अपहृत चौघांची अखेर सुटका

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:55AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी 

येथून अपहरण झालेल्या गोव्याच्या चार तरुणांना शोधून काढण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी)च्या पथकाने आजरा येथून या तरुणांना सुखरूप पोलिस मुख्यालयात आणले. कोल्हापूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, या अपहरण नाट्यामुळे गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातही खळबळ उडाली असून गुन्हेगारी टोळ्यांचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकल्याचे बोलले जात आहे.
गोव्यातील राहुल दिलीप धारगळकर (वय 21), ज्ञानेश्‍वर गोकाककर (21, दोघे रा. धुळेर- म्हापसा), मनोज गावकर (20), सावळो गावकर (20, दोघे रा. मये) हे चौघे शुक्रवारी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते.

‘पैसे नही दिये तो लडकेको मार दूंगा’ 

कोल्हापूर : प्रतिनिधी 

देवदर्शन आटोपून शनिवारी सर्वजण गोव्याकडे निघाले. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अपहृत राहुलच्या वडिलांना अज्ञाताचा फोन आला. हिंदी भाषेत बोलणार्‍या अपहरणकर्त्याने 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. ‘पैसे नही दिये तो लडकेको मार दूंगा’ असे धमकावले. धारगळकर यांनी याची माहिती संकेश्‍वर पोलिसांना दिली. पोलिसांसोबत त्यांनी संकेश्‍वर, निपाणी परिसर पिंजून काढला. यानंतर अपहरणकर्त्यांनी जयसिंगपूर येथे बोलाविल्याने याची माहिती कोल्हापूर पोलिसांना देण्यात 
आली. 

पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने जयसिंगपूर येथे रविवारी दुपारी सापळा रचला पण अपहरणकर्त्यांनी पुन्हा ठिकाण बदलले. पुन्हा नृसिंहवाडीत बोलावून चकवा दिला. रविवारी दिवसभर अपहरणकर्ते पोलिसांसह पालकांना चकवा देत होते. सोमवारी सायंकाळपयर्ंंत हा प्रकार सुरुच होता.

दरम्यान, अपहरणकर्त्यांची माहिती पोलिसांनी मिळवली. सर्व संशयित रेकॉर्डवरील असल्याने त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नातेवाईकांकरवी अपहरणकर्त्यांना फोन गेल्याने त्यांनी अपहरण झालेल्या चारही तरुणांना सोमवारी मध्यरात्री आजरा परिसरात सोडून पलायन केले.