होमपेज › Goa › विकासासाठी शिक्षणावर भर द्यावा

विकासासाठी शिक्षणावर भर द्यावा

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 1:23AM

बुकमार्क करा
वाळपई ः प्रतिनिधी

 मराठा समाजाचा इतिहास महान असून याच इतिहासावर जगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी समाजाने आपल्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. येणार्‍या काळात समाजोन्नतीसाठी वेगवेगळय प्रकारचे उपक्रम हाती घेऊन कार्याला चालना देणे गरजेचे  आहे, असे  अ‍ॅड. हरिश्‍चंद्र नाईक यांनी सांगितले.  होंडा येथील सुंदरम् सभागृहात सत्तरी शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठा समाजाच्या तिसर्‍या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर, उपाध्यक्ष वासुदेव परब, उपाध्यक्ष कृष्णा माजीक, खजिनदार गुरुदास गांवस, संयोजक उदय सावंत, सचिव सुभाषचंद्र गावस, कारापूर-सर्वणचे सरपंच रमेश सावंत, सल्लागार हरिश्‍चंद्र गावकर, हरिश्‍चंद्र गावस, म्हाऊस सरपंच वंदना गावस, महिला अध्यक्ष सपना परब, कार्यकारी सभासद प्रकाश गावकर, रमेश झर्मेकर, भालचंद्र गावकर, गोपाळ गावकर, नारायण गावस, अंकुश बोर्डेकर, संजय गावकर, अशोक धावस्कर, दत्ता सावंत आदींची उपस्थिती होती.

गोवा मुक्तीनंतरच्या आजवरच्या कालखंडात सत्तरीतील शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठा समाजाने ज्या पद्धतीने विकासाची झेप घेतली आहे, त्याला तोड नाही. विकासाच्या वेगवेगळय स्तरावर या समाजाला अनेक घटक मार्गदर्शक म्हणून आधार बनून राहिलेले आहेत. यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विद्यमान आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे योगदान इतिहासाची साक्ष देणारे आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही, असा सूर  महामेळाव्यातील विविध सत्रात   मान्यवरांनी व्यक्त केला.    विष्णू गावस यांनी यावेळी सादर केलेल्या‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या सुप्रसिद्ध ऐतिहासिक नाटकाच्या बहारदार प्रवेशाने उपस्थितांची मने जिंकली.

महामेळाव्याचे अध्यक्ष व जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर यांनी सांगितले, की समाजाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत समाजमंडळींचे अथक परिश्रम आहेत. समाज विकासात भागाचे नेते प्रतापसिंह राणे व विश्‍वजित राणे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. येणार्‍या काळात या समाजाच्या विकासप्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजसंघटना संयोजक उदय सावंत यांनी सांगितले की, कृषी, वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक विकासात समाजाने जी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे यात राणे घराण्याचे वेगवेगळय स्तरावर प्रोत्साहन लाभले आहे. आता या समाजाचा शैक्षणिक स्तरावर विकास करण्यासाठी व समाजातील वेगवेगळय क्षेत्रात अभिमानाची कामगिरी करणाऱया समाजमंडळींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या समाजाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र काही विरोधक या समाज संघटनेला राजकीय समीकरणात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे, तो मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा व ही एक निव्वळ समाजसंघटना असल्याची भावना दृढ करावी,असे आवाहन केले आहे.