Sun, Feb 23, 2020 09:13होमपेज › Goa › आदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा

आदिवासी वन कायदा ग्रामसभेत संमत करा

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:17PM

बुकमार्क करा

शिगाव: प्रतिनिधी

केंद्र सरकारने आणलेला आदिवासी वन कायद्याला मान्यता मिळवण्यासाठी ग्रामसभेत सर्व नागरिकांनी उपस्थित  राहून त्याला मान्यता द्यावी. राज्य सरकार या विषयी गंभीर असून लोकांनी कसलेल्या जमिनी त्यांना मिळवून देण्यासाठी या कायद्याचा  उपयोग होणार आहे, असेे प्रतिपादन कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

शिगाव शाळा समूहाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गावडे बोलत होते. व्यासपीठावर  जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, कुळे शिगाव सरपंच गंगाराम लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, पंचायत सदस्य मच्छिंद्र देसाई, आरुषी सावंत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शशीकांत  वेळीप व प्रभारी मुख्याध्यापक  सुहास मापार उपस्थित होते.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की  विद्यालयाला कला व संस्कृती खात्यातर्फे संगीत शिक्षक  या हायस्कूलसाठी  देणार आहे. जो माणूस सातत्याने प्रयत्न करतो त्याला  यश प्राप्त होते.   प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:वर विश्‍वास असायला हवा. अभ्यासाबरोबर कलेच्या क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यानी पुढे यायला हवे. गोविंद गावकर,  शशिकांत वेळीप,  गंगाराम लांबोर,  मच्छिंद्र देसाई यांनी विचार मांडले.

श्रेया संतोष नाईक यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविल्याने तिचे अभिनंदन करण्यात आले.  सेजल  नाईक हिला सम्राट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याना   बक्षिसे प्रदान करण्यात आली. खुशाली मामलेकर यांनी सूत्रसंचालन  केले. दिनेश देसाई यांनी आभार मानले.