Wed, Feb 19, 2020 08:54होमपेज › Goa › उघड्यावर स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांवर होणार कारवाई

उघड्यावर स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांवर होणार कारवाई

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 2:06AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर स्वयंपाक करून कचरा टाकणार्‍या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रवी ठरणार्‍या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी जानेवारी अखेरीस विशेष कारवाई पथके  नेमली जातील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सभागृहात शून्य तासावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर बनवलेे जाणारे जेवण आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या कचर्‍याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

म्हणाले की, काही पर्यटक मिरामार व अन्य भागांत उघड्यावर स्वयंपाक बनवतात. सरकार अशा पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी येत्या महिन्यात कारवाई पथके स्थापन करण्यात येतील. 2001 सालच्या कायद्यात दुरुस्ती करून पर्यटकांना सार्वजनिक  उपद्रव  म्हणून  घोषित करून  त्यांच्यावर कारवाई  होणार आहे. कमी बजेट असलेले पर्यटक बसगाड्या घेऊन  येतात व ते अग्रशाळा किंवा मंदिरांत राहतात. 

अशा पर्यटकांना स्वयंपाक करता यावा, यासाठी ठराविक जागा सरकार निश्चित करील. त्याठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधाही पुरविली जाईल. पर्यटक तिथून गेल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी नेमले जातील. यासाठी अल्पसे शुल्कही पर्यटकांकडून आकारले जाणार आहे.