Fri, Feb 22, 2019 00:10होमपेज › Goa › वीजमंत्र्यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर कारवाई करा 

वीजमंत्र्यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर कारवाई करा 

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:22AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुने गोवे येथील बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश नगर नियोजन खात्याकडून भारतीय पुरातत्त्व विभागाला देण्यात आले आहेत. 

तिसवाडी उप-नगर नियोजक आर. एन. वळवईकर यांनी यासंदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाला निर्देश दिले आहेत. यापूर्वी पुरातत्त्व व पुराभिलेख खात्यानेदेखील मडकईकर यांच्या बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर कारवाई करण्यास सांगितले होते.

भारतीय पुरातत्त्व विभागाने काही दिवसांपूर्वी मडकईकर यांना पत्राद्वारे  बंगल्याची संरक्षण भिंत व उद्यानाच्या बांधकामासंदर्भातील राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून प्राप्त केलेली परवानगी सादर करण्यास सांगितले होते.

वीजमंत्री मडकईकर यांच्या कथित बेकायदेशीर बंगल्याची संरक्षण भिंत ही बसिलिका ऑफ बॉम जिजस या चर्चच्या 50 मीटर अंतरावर बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी नगर नियोजन खात्याकडे केली होती. मडकईकर यांच्या बंगल्याविरोधात  अ‍ॅड. रॉड्रिगीस यांनी जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, ती अद्यापही नोंद करण्यात आलेली नाही.