Fri, Jul 19, 2019 05:08होमपेज › Goa › वास्कोत तीन ठिकाणी कारवाई 

वास्कोत तीन ठिकाणी कारवाई 

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 12:00AMदाबोळी : वार्ताहर

गांजा बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी तीन विविध कारवायांमध्ये  आशिष शिरोडकर (22), विनोदकुमार यादव (35) अमित बिंद (20) तीन युवकांना अटक करून त्यांच्याकडून अनुक्रमे 15 हजार,7 हजार 200 व 2 हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेडलॅण्ड सडा येथील आशिष शिरोडकर (22) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 15 हजार रुपयांचा 75 ग्राम गांजा जप्त केला. दरम्यान, आणखी एका कारवाईत  विनोदकुमार यादव (35) या मांगोरहील येथे राहणार्‍या युवकाला 7,200 रुपयांचा गांजा बाळगल्या प्रकरणी बायणा येथे अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार वास्को पोलिसांना देस्तेरो चॅपेल, वास्को येथे एक युवक गांजा विक्रीस येणार असल्याची माहिती मिळताच वास्को  पोलिस उपनिरीक्षक विकास दयेकर यांनी पाळत ठेवली असता त्यांना हेडलॅण्ड सडा येथील आशिष शिरोडकर (22) हा युवक हाती लागला.  

दरम्यान, आणखी दोन कारवाईत वास्को पोलिसांनी विनोदकुमार यादव (35) मांगोरहील येथे राहणार्‍या युवकाला 7,200 रुपयांचा गांजा बाळगल्या प्रकरणी बायणा येथे अटक केली. सदर कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी केली. तर अन्य एका कारवाईत मांगोरहील येथील अमित बिंद   (20) याला दोन हजार रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक नेहांदा तावारेस यांच्या पथकाने अटक केली. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.