Thu, Apr 25, 2019 14:15होमपेज › Goa › सहकारी महिलेवरील बलात्कार प्रकरण 

आरोप रद्द करण्याची तेजपाल यांची याचिका फेटाळली

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:01AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सहकारी महिला कर्मचार्‍यावर बलात्कार  केल्याप्रकरणी  तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल  यांच्याविरोधात निश्‍चित करण्यात आलेले आरोप रद्द करण्यासंबंधीची याचिका  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपाल यांच्या विरोधात बलात्कार प्रकरणी खटला  सुरूच राहणार आहे. 

तेजपाल यांनी  आपल्या विरोधात  निश्‍चित करण्यात आलेले आरोप  रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात  दाखल केली होती. या याचिकेवरील  सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने गेल्या आठवड्यात निवाडा राखून ठेवला होता.