Mon, Jul 06, 2020 12:00होमपेज › Goa › बांबोळी येथे अपघातात दुचाकीवरील महिला ठार

बांबोळी येथे अपघातात दुचाकीवरील महिला ठार

Last Updated: Nov 08 2019 1:40AM
पणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथे दुचाकी व बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली अंजू गाड (वय 45) ही महिला जागीच ठार झाली. दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. या अपघातास कारणीभूत ठरलेली प्रवासी बस पोलिसांनी पणजी बसस्थानकावरून ताब्यात घेतली असून बस चालकालाही अटक करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सदर अपघात हा सकाळी घडला. प्रवासी बसने दुचाकीला जबरदस्त ठोकर मारली व तेथून पळ काढला. यात दुचाकीच्या मागे बसलेल्या गाड या जागीच ठार झाल्या, तर दुचाकी  चालक गंभीर जखमी झाला. मात्र, अपघात घडल्यानंतर कुठल्या पोलिस स्थानकाच्या हद्दीत हे ठिकाण येते यावरुन प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस या ठिकाणी जवळपास दोन तासांनी पोचले. अपघात घडल्यानंतर लोकांनीच बसचा शोध घेतला. पणजी बसस्थानकावर ही बस पार्क करुन ठेवण्यात आलेल्या स्थितीत आढळून आली. या अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.