Sun, Sep 23, 2018 10:10होमपेज › Goa › धारगळ येथे दोन एटीएम फोडून ३० लाखांची रोकड लंपास

धारगळ येथे दोन एटीएम फोडून ३० लाखांची रोकड लंपास

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

पेडणे : प्रतिनिधी  

धारगळ पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग 17 शेजारील भर लोकवस्तीतील स्टेट बँक ऑफ इंडिया व कॉर्पोरेशन बँक या दोन बँकांचे एटीएम सोमवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास फोडून एकूण 30 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारगळ येथील दोन्ही चोर्‍या रात्री दोन नंतर घडल्या असाव्यात, अशी शक्यता असून, चोरट्यांनी दोन्ही एटीएम  गॅस कटरने फोडले व त्यातील रोकड लंपास केली. पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून पंचनामा केला .

दरम्यान, मागच्या दोन महिन्यांपूर्वी आगरवाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम  जंगलात नेऊन फोडला होता, या चोरीचा पेडणे पोलिसांनी छडा लावून चोरट्यांना गजाआड केले होते. धारगळ येथील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमला नव्हता. तसेच तालुक्यात अलीकडे वाढलेल्या चोर्‍यांमुळे लोकांत चिंता वाढली असून रात्रीची पोलिस गस्त नसल्यानेच असे चोरीचे प्रकार वाढत असल्याची खंत लोक व्यक्त करीत आहेत.