Mon, Mar 25, 2019 03:24
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › गोवा डेअरीवर एसीबीचा छापा; सहायक व्यवस्थापक ताब्यात

गोवा डेअरीवर एसीबीचा छापा; सहायक व्यवस्थापक ताब्यात

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरीवर सोमवारी भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) छापा टाकून लाच घेतल्याच्या आरोपावरून  डेअरीचे सहायक व्यवस्थापक (अभियांत्रिकी) विनायक धारवाडकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसीबीच्या या कारवाईमुळे गोवा डेअरीत एकच खळबळ उडाली. आर्थिक गैरव्यवहार,  भ्रष्टाचार, घोटाळा यामुळे मागील काही महिन्यांपासून गोवा डेअरीचा कारभार बराच गाजत आहे. गोवा डेअरीतील भ्रष्टाचारासंदर्भाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर  केलेल्या चौकशी  अहवालाच्या पार्श्‍वभूमीवरच एसीबीकडून सदर छापा टाकण्यात आला. यावेळी कार्यालयाची झडती घेण्यात आली. धारवाडकर यांना यावेळी लाच घेतल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची एसीबीकडून कसून चौकशी सुरु  असल्याची माहिती  यावेळी सूत्रांनी दिली. एसीबीच्या या कारवाईमुळे गोवा डेअरीच्या अन्य काही अधिकार्‍यांमध्ये  घबराट पसरली आहे.