Wed, Sep 19, 2018 20:56होमपेज › Goa › खाण अवलंबितांच्या मोर्चाचा फज्जा

खाण अवलंबितांच्या मोर्चाचा फज्जा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी  

खाण अवलंबितांचा मोर्चा  पणजी पोलिसस्थानकावर धडकणार  या शक्यतेने सदर परिसरात  सोमवारी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनकर्ते फिरकलेच नाहीत. पणजीत 19 मार्च रोजी शेकडोच्या संख्येने  खाण अवलंबितांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते.  या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांच्या  मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे.पणजी पोलिसांकडून या आंदोलकांना समन्स जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांची धरपकड करण्यासाठी राज्यातील विविध पोलिस स्थानकांनादेखील बिनतारी संदेश जारी केला आहे.  पोलिसांकडून होणार्‍या या कारवाई विरोधात   पणजी  पोलिसस्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी  1 एप्रिल रोजी फोंडा येथे झालेल्या बैठकीत दिला होता. त्यानुसार   आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पणजी पोलिस स्थानकाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस कर्मचार्‍यांबरोबरच   राखीव  दलाचे पोलिसदेखील दुपारी  3.30 वाजल्यापासून तैनात  करण्यात आले होते. मात्र, आंदोलनकर्ते फिरकलेच नसल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी 19 मार्च रोजी झालेल्या  आंदोलनानंतर आतापर्यंत  60 हून अधिक आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यापैकी बहुतेक जणांनी  पणजी न्यायालयात  अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 

Tags : Goa Goa News, large, police force,  deployed, area,  Monday.


  •