Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Goa › बेतोड्यात ८ लाखांचे पॉपकॉर्न जप्त 

बेतोड्यात ८ लाखांचे पॉपकॉर्न जप्त 

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 12:15AMफोंडा : प्रतिनिधी

वैद्यनगर, दत्तगड बेतोडा येथील जयदेव फूड प्रॉडक्ट या पॉपकॉर्न निर्मितीच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून 7,84,721 रुपयांचा माल जप्त केला.  मुदत   संपून एक वर्ष उलटलेल्या  कच्चा मालापासून तेथे पॉपकॉर्न निर्मिती करण्यात येत होती. सध्या बाजारात उपलब्ध असलेले पॉपकॉर्न नावाचे खाद्य मुलांनी खाऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी केले आहे.   

जयदेव फूड प्रॉडक्ट या कारखान्यात अधिकार्‍यांनी तपासणी केली असता कच्चा मालाच्या 275 बॅगा आढळून आल्या. प्रत्येक बॅग 30 किलोची होती. त्यापासून गेल्या सहा महिन्यात पॉपकॉर्न तयार करण्यात येत होते. तयार केलेले पॉपकॉर्न एका प्लास्टिक कपमध्ये घालून बंद केले जाते. मुख्य म्हणजे ‘एक्सपायरी डेट’उलटलेल्या कालबाह्य मालापासून बनवलेल्या पॉपकॉर्नच्या कपवर आणखी  तीन महिन्यांचा कालावधी नोंद करण्यात आला आहे.