Thu, Nov 15, 2018 22:59होमपेज › Goa › हणजूण येथे 6.75 लाखांचा गांजा जप्त 

हणजूण येथे 6.75 लाखांचा गांजा जप्त 

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:56PMम्हापसा  : प्रतिनिधी

चिवार हणजूण येेथे  सोमवार  दि. 3 रोजी  रात्री 10.45 वा. एका हॉटेल जवळ ग्राहकाची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवीण अरविंद पंडीत (वय 25) या बिहारी इसमास  पकडून  त्याच्याकडील 3.480 किलो वजनाचा  6.75 लाख रुपये किंमतीचा गांजा  हणजूण पोलिसांनी जप्त केला.  

आरोपी हणजूण चिवार येथे  राहत होतो. तो गवंडी व्यवसाय करायचा. सोमवारीच तो बिहारहून आला व येताना गांजा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना  मिळाल्याने ग्राहका ची वाट पाहत असताना पोलिसांनी संशयिताला अटक करून  गांजा जप्त केला. त्याच्याकडे 270 रुपये  रोख रक्कम मिळाली.

पोलिस निरीक्षक  चेतन पाटील यांच्या  नेतृत्वाखाली, उपनिरीक्षक, विदेश पिळगावकर, शिपाई तीर्थराज म्हामल, श्रीकृष्ण  रेडकर, योगेश कोरगांवकर व अमीर साळगावकर यांनी ही कारवाई केली.