होमपेज › Goa › आसगावात ४.५ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

आसगावात ४.५ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:25AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

अमली पदार्थविरोधी पथकाने आसगाव येथे  केलेल्या कारवाईत  अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी  सॅमसन बॅसिलियन्स (वय 32, मंगळूर) व थॉमस अमबट (49, विरार, मुंबई) या दोघा संशयितांना  अटक केली.  संशयितांकडून साडेचार लाख  रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्‍त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांकडे आढळलेल्या  एका बाटलीत 4 ग्रॅम वजनाचे लिक्‍वीड एलएसडी व 180 ग्रॅम वजनाच्या चरसचा समावेश  आहे. त्याचबरोबर संशयितांकडून  महिंद्रा ड्युरो  दुचाकी व एक मोबाईलही जप्‍त करण्यात आला.  प्राप्‍त माहितीच्या आधारे बाडे आसगाव येथे अमली पदार्थविरोधी पथकाचे उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी बुधवारी रात्री 9.30 ते गुरुवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या  दोन्ही संशयितांविरोधात  अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.