Wed, Nov 14, 2018 04:32होमपेज › Goa › ‘युनायटेड इंडिया’च्या फोंडा शाखेत ३५ हजारांची चोरी

‘युनायटेड इंडिया’च्या फोंडा शाखेत ३५ हजारांची चोरी

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 12:08AMफोंडा : प्रतिनिधी

तिस्क फोंडा येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या शाखा कार्यालयातील मागच्या बाजूच्या खिडकीचे ग्रिल्स तोडून अज्ञातांनी रोख 35 हजार रुपये लंपास केले. सदर प्रकार गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी  फोंडा पोलिसात रितसर तक्रार देण्यात आली असून पोलिस याप्रकरणी चौकशी करीत आहेत. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता झाडू मारण्यासाठी आलेल्या महिला कर्मचार्‍याला  कार्यालयाच्या खिडकीचे ग्रिल्स तोडलेल्या स्थितीत आढळून आले. कार्यालयात रात्री अज्ञातांनी ग्रिल्स तोडून प्रवेश केल्याची माहिती तिने त्वरित शाखा व्यवस्थापक अनुराधा बोरकर याना माहिती दिली.

पोलिस स्थानकात तक्रार दिल्यांनतर उपनिरीक्षक मेलसन कुलासो यांनी कार्यालयात जाऊन तपासणी केली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील दोन कपाटांची दारे उघडून त्यातील 33 हजार रोख व व्यवस्थापकांच्या पर्स मधील 2 हजार असे एकूण 35 हजार रुपये लंपास केल्याचे आढळून आले. कार्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या खिडकीचे ग्रिल्स काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.  
पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकांना पाचारण करुन तपास केला. निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेलसन कुलासो याप्रकरणी तपास  करीत आहे.