Mon, Apr 22, 2019 12:33होमपेज › Goa › पेडणेतील ३ पंचायतीत उत्स्फूर्त ९२ टक्केमतदान

पेडणेतील ३ पंचायतीत उत्स्फूर्त ९२ टक्केमतदान

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:11PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल-हसापूर ग्रामपंचायतीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने एकूण 91.77 टक्के इतके मतदान झाले. पंचायत संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कासारवर्णेमधील पाच प्रभागांतील एकूण 999 मतदारांपैकी 939 जणांनी मतदान केल्यामुळे या पंचायतीत सर्वाधिक 93.99 टक्के मतदान झाले. 

हळर्ण पंचायतीच्या सात प्रभागांमध्ये  एकूण 1265 मतदारांपैकी 1175 जणांनी मतदानात भाग घेतला असून मतांची टक्केवारी 92.89 इतकी झाली. यात प्रभाग क्र.1मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. 

चांदेल-हसापूर पंचायतीच्या पाच प्रभागांतील एकूण 1675 मतदारांपैकी  1501 जणांनी (89.61 टक्के) मतदान केले. पेडणे तालुक्याच्या या तीन पंचायतीच्या मतदानाची सरासरी 91.77 टक्के झाली आहे. याशिवाय पेडणेतील पाले पंचायतीच्या प्रभाग क्र.1मध्ये 91.53 टक्के मतदान झाले. फोंडा तालुक्यातील मडकई पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मध्ये 80.82 टक्के, तर कुंडई पंचायतीच्या प्रभाग क्र.1मध्ये 82.20 टक्के मतदान झाले. सांगे तालुक्यातील उगे पंचायतीच्या प्रभाग क्र. 7 मध्ये झालेल्या मतदानात 82.88 टक्के मतदान झाले आहे. या सर्व मतदान प्रक्रियेत कुठेही गडबड-गोंधळ झाला नसल्याचे गोवा राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.