Thu, Jan 24, 2019 11:54होमपेज › Goa › खोतीगाव येथे उसाला आग लागून ३ लाखांचे नुकसान

खोतीगाव येथे उसाला आग लागून ३ लाखांचे नुकसान

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMकाणकोण : प्रतिनिधी

जायफोड, खोतीगाव येथील कापणीस तयार झालेल्या ऊस शेताला आग लागल्याने  ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी ही घटना घडल्याचे काणकोण अग्निशमन दलाचे प्रमुख आर.के.पेडणेकर यांनी सांगितले.  विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता आहे. 

पैगिंण येथील युवा शेतकरी प्रसाद वेळीप यांनी जायफोड येथील पडीक जमीन भाडेपटटीवर घेऊन त्या जमिनीवर विविध प्रकारच्या भाज्यांबरोबरच, मिरची व उसाची लागवड केली होती. सध्या ऊस कापणीसाठी आला होता. आग लागल्याने अवघ्या अर्ध्या तासातच पूर्ण उसानेे पेट घेतला. वेळीप यांनी साडेसात हेक्टर जमिनीत उसाची लागवड केली होती.

आगीची माहिती मिळताच काणकोण अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. पण तोपर्यंत 90टक्के ऊस  जळून खाक झाला होता.आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नी शामक दलाला तीन बंब वापरावे लागले.