Wed, May 22, 2019 06:15होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर २८ लाखांचे सोने जप्‍त

‘दाबोळी’वर २८ लाखांचे सोने जप्‍त

Published On: Jun 05 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 1:36AMदाबोळी : प्रतिनिधी 

दाबोळी विमानतळावर सोमवारी   कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी  केलेल्या कारवाईत एअर इंडिया विमानातून (एआय-994) आलेल्या एका प्रवाशाकडून 28.62 लाख रुपये किंमतीचे 995 ग्रॅम सोने जप्‍त केले. संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. 

प्राप्‍त माहितीनुसार दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया एआय-994 या विमानात जाऊन कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी   प्राप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीवेळी एका आसनावर दोन चंदेरी रंगाच्या लहान पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या त्यांनी पडताळून पाहिल्या असता त्यात त्यांना चॉकलेटी रंगाच्या पावडरच्या स्वरुपात सोन्याची पावडर सापडली. सदर आसनावरील प्रवाशाने ती आपल्या आसनाखाली सेफ्टी जॅकेटमध्ये लपवून ठेवली होती.

कस्टम अधिकार्‍यांनी त्याच्याकडे याविषयी चौकशी केली असता त्याने त्या बॅगेतील सोने स्वतः आणल्याची कबुली दिली. कस्टम अधिकार्‍यांनी हे सोने जप्‍त करुन सदर प्रवाशाला ताब्यात घेतले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 28.62 लाख रुपये एवढी किंमत होते. कस्टम आयुक्‍त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.