Thu, Mar 21, 2019 11:11होमपेज › Goa › महिलांवरील अत्याचारांच्या सहा महिन्यांत 214 तक्रारी

महिलांवरील अत्याचारांच्या सहा महिन्यांत 214 तक्रारी

Published On: Jul 29 2018 1:21AM | Last Updated: Jul 28 2018 11:50PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील विविध पोलिस स्थानकांमध्ये मागील सहा महिन्यांत   महिलांवरील अत्याचारांच्या  214 तक्रारी नोंद झाल्याची माहिती  सूत्रांनी दिली. या तक्रारींमध्ये   बलात्कार, विनयभंग आदी  गुन्ह्यांचा समावेश  आहे. प्राप्‍त माहितीनुसार, 2015 साली  राज्यातील विविध  पोलिसस्थानकांमध्ये महिलां विरोधातील अत्याचारांच्या  448  तक्रारी नोंद झाल्या होत्या. 2016 साली  411 तर  2017 मध्ये  422  तक्रारी नोंद झाल्या.  तर  यावर्षी अवघ्या सहा महिन्यांत  म्हणजेच  30 जून पर्यंत हा आंकडा 214  इतका असल्याची माहिती देण्यात आली.

सरासरीपेक्षा यावर्षी महिला अत्याचारांच्या नोंद झालेल्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहेत.  मागील  साडेतीन   वर्षात   नोंद झालेल्या  तक्रारींपैकी  काही प्रकरणांचा  तपास करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.   2015 साली  नोंद झालेल्या  448  तक्रारींपैकी  39 प्रकरणांचा तपास लागलेला नाही. 2016  मधील  411  तक्रारींपैकी  46, 2017 मधील 422  तक्रारींपैकी  39 प्रकरणांचा तपास झालेला नाही.  तर  यावर्षी  नोेंद झालेल्या 214 तक्रारींपैकी 22 तक्रारीचा तपास लागलेला नाही. राज्यात  पणजी व मडगाव अशी दोन महिला  पोलिस्थानके आहेत.  त्यापैकी पणजी महिला पोलिसस्थातकात 28 तर   मडगाव महिला पोलिसस्थानकात   आठ   कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.