Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Goa › बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल

बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात 200 पानी आरोपपत्र दाखल

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

सांताक्रुझचे माजी  आमदार  बाबूश मोन्सेरात  यांच्या विरोधात  2016 सालच्या  अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात पणजी महिला पोलिस ठाण्याने पणजी न्यायालयात  सुमारे 200 हून अधिक पानी तसेच 40 साक्षीदारांचा समावेश असलेले आरोपपत्र दाखल केले.

या बलात्कार प्रकरणामुळे   संपूर्ण गोव्यात एकच खळबळ उडाली होती.  मे 2016 मध्ये मोन्सेरात यांच्या विरोधात   पोलिसांनी  रात्री उशिरा  बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर  मोन्सेरात  मुंबईहून गोव्यात दाखल होताच त्यांनी  रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागात जाऊन शरणागती पत्करली होती.

पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर  संध्याकाळी उशिरा त्यांना अटक केली होती. काही दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. ज्या फार्महाऊसवर  बलात्काराचा हा प्रकार घडला  असल्याचे सांगितले जात होते त्या फार्महाऊसचीही पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून झडती घेण्यात आली होती.

मोन्सेरात यांनी   हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले होते.  मोन्सेरात यांनी  मार्च 2016 महिन्यात पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा  सुरवातीला पणजी  पोलिसस्थाकात नोंद करण्यात आला होता. त्यानंतर  हे प्रकरण महिला पोलिस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले होते. पीडित मुलगी ही नेपाळी  आहे.  पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर  या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 376(बलात्कार), 370 (लैंगिक अत्याचार),342 व 328(दंडात्मक) तसेच गोवा बाल हक्‍क कायद्याखाली  मोन्सेरात यांच्या विरोधात  गुन्हा नोंदवण्यात आला  होता.