Wed, Jul 24, 2019 06:16होमपेज › Goa › फोंड्यात ट्रकची कारला धडक; २गंभीर 

फोंड्यात ट्रकची कारला धडक; २गंभीर 

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:27AMपणजी : प्रतिनिधी

कुर्टी-फोंडा येथील क्रीडा संकुलाजवळील मुख्य रस्त्यावर रविवारी सकाळी एका ट्रकने अल्टो कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील अभिजीत प्रभुगावकर आणि डॉ. हेमाली देसाई हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अभिजीत प्रभुगावकर आणि डॉ. हेमाली देसाई हे दोघेही जीओ-05-डी-0221 या अल्टो कारमधून वारखंडेहून प्रमुख रस्त्याकडे जात होते.  मुख्य रस्त्यावर पोहचताच त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार  धडक दिली.ही धडक इतकी जोरदार की कारचा  चेंदामेंदा होऊन  पूर्णपणे नुकसान झाले. 

सदर  अपघात  उड्डाणपुलाचे काम  सुरू असलेल्या ठिकाणी झाला. पुलासाठी वापरले जाणारे अवजड लोखंडी सामान इथे रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होतेे. मात्र अपघात होऊ नये, या दृष्टीने  इथे कसलीच सावधगिरी बाळगली गेली नसल्याचे दिसून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री या ठिकाणी काळोख पसरत असल्याने अपघाताचा धोका अधिक गंभीर आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर लोकांनी संताप व्यक्त केला. दोन्ही जखमींना त्वरित फोंडा उपजिल्हा इस्पितळात नेण्यात  आले आणि नंतर डॉ. हेमाली देसाई यांना पुढील उपचारांसाठी गोवा मेडिकल महाविद्यालयामध्ये (गोमेकॉ) हलविण्यात आले असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.