Tue, Nov 20, 2018 16:55होमपेज › Goa › पालिका प्रशासनातील १७ सेवा ऑनलाईन

पालिका प्रशासनातील १७ सेवा ऑनलाईन

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:27AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

नगर विकास खात्याच्या वेब पोर्टलमुळे राज्यातील नागरिकांना नगरपालिका प्रशासनातील सुमारे 17 विविध सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. कालबद्ध सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार असून त्यात  पालिकेतील सेवांचाही समावेश करण्यात येणार  आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्यातील सर्व चौदाही नगरपालिकेच्या संबंधित नागरिकांना समान सेवा पुरवणार्‍या वेब पोर्टलचा गुरुवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते  प्रारंभ करण्यात आला. 

याप्रसंगी नगरविकासमंत्री  फ्रान्सिस डिसोझा, खात्याचे सचिव सुधीर महाजन, मुख्य प्रकल्प अधिकारी  जगदीश होसमणी, ‘सुडा’चे सदस्य सचिव आर. मेनका आणि खासगी बँकांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

पर्रीकर म्हणाले की, पालिकांच्या पोर्टलमध्ये कचरा संकलनाच्या मोहिमेबद्दलही नागरिकांना माहिती व शुल्क भरणा करण्याची सोयही मिळणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावर प्रत्येक नगरपालिकांशी स्वतंत्ररित्या संपर्क साधून एकूण 17 सेवा ऑनलाईन स्वरूपात मिळवता येणे शक्य आहे. जन्म- मृत्यू नोंदणी, त्यातील चुकांची दुरूस्ती, घरपट्टीचे ऑनलाईन भरणा, घरपट्टीचे हस्तांतर, व्यवसाय परवाना, जाहिरात फलक परवाना, सभागृह बुक करणे, पाणी- विजेसाठी अर्ज, दुकानांचे भाडे भरणा करणे, मलनिस्सारण टँकर, शववाहिका बुक करणे, उत्पन्‍नाचा दाखला आणि इतर सेवा घेण्यास लाभ मिळणार असल्याची माहिती खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.