Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Goa › राज्यात गुरुवारी १५ टन गोमांसाचा पुरवठा : बेपारी

राज्यात गुरुवारी १५ टन गोमांसाचा पुरवठा : बेपारी

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:21AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील बाजारपेठेत गुरुवारी (दि. 11) 15 टन गोमांसाचा पुरवठा झाला. जवळपास सर्व गोमांस विक्री दुकांनामध्ये हा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कुरेशी मांस विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मन्‍ना बेपारी यांनी दिली.

परराज्यातून गोव्यात आयात केले जाणारे गोमांस हे बेकायदेशीर असल्याचा आरोप करुन त्यावर प्राणी मित्र एनजीओंकडून होणार्‍या कारवाईमुळे गोमांस विक्रेत्यांनी संप पुकारला होता. सरकारने  या प्रश्‍नी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. मात्र, कर्नाटक येथून गोव्यात होणार्‍या गोमांस पुरवठा अजूनही  हवा तसा सुरळीत झालेला नाही.

बेपारी म्हणाले, की गोव्यात रोज 25 टन गोमांसाची आवश्यकता भासते. मात्र, गोमांसाची गोव्यात होणार्‍या वाहतूकीदरम्यान प्राणीमित्र एनजीओंकडून अडथळे निर्माण केले जातात. यामुळे कर्नाटक येथील गोमांस पुरवठादार काही प्रमाणात भयभीत झाले आहेत. त्यामुळे  गोमांसाचा गोव्यात पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यास काही वेळ जाईल. गुरुवारी राज्यात 15 टन गोमांस दाखल झाले. उत्तर व दक्षिण गोव्यातील सर्व गोमांस विक्री दुकानांवर ते उपलब्ध  करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.