Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Goa › भारतात होमिओपॅथी प्रगतिपथावर

भारतात होमिओपॅथी प्रगतिपथावर

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 8:11PM

बुकमार्क करा
शिरोडा : वार्ताहर

भारतात होमिओपॅथी प्रगतीपथावर आहे, ती लवकरच औषधांची सर्वाधिक पसंतीची शाखा बनणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या 14 व्या पदवीदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, प्राचार्य डॉ. एस. डी. नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस, इंटर्नशिप इन-चार्ज डॉ. एस. के. बरीक, प्राध्यापक डॉ. आर. बी. देसाई आणि रहिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश शेट यावेळी उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले, की भारत होमिओपॅथी औषधांमध्ये आघाडीवर आहे. येणार्‍या काही वर्षांत त्याची प्रगती होइल. होमिओपॅथीला अतिशय उज्ज्वल भविष्य आहे. होमिओपॅथी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ती लवकरच औषधांच्या सर्वाधिक पसंतीच्या शाखांमध्ये बनेल. होमिओपॅथी विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात काम करावे.  विद्यार्थ्यांनी या माध्यमातून आपले ज्ञान वाढवावे आणि या क्षेत्रात कौशल्य विकसित करावे.  

सुभाष शिरोडकर यांनी सांगितले, की होमिओपॅथीला जगातील सर्वोत्तम औषधोपचाराची व्यवस्था करण्यासाठी या क्षेत्रातील उच्च ज्ञान  विद्यार्थ्यांनी प्राप्त करावे.  विद्यार्थ्यांनी कठोर परीश्रम घेतले पाहिजेत. वचनबद्धता व चिकाटीने काम केले करण्याबरोबर आणि समाजासाठी काम करण्याची गरज आहे. प्राचार्य  एस. डी. नाईक यांनी स्वागत केले. मनोहर आडपईकर, प्रदीप शेट,  व्ही. डी. चणेकर आणि डॉ. नील मस्कारेन्हस  आदी मान्यवर  उपस्थित होते.