Sun, May 26, 2019 21:05होमपेज › Goa › खोला येथे ट्रॅव्हलर उलटून १४ जखमी

खोला येथे ट्रॅव्हलर उलटून १४ जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खोला/काणकोण : प्रतिनिधी

आमोणे, कुंकळ्ळी येथून आगोंदकडे जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर पारये कट्टा खोला येथे उतरणीवर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ब्रेक निकामी होऊन उलटल्याने झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले. 5 प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले तर  9  प्रवाशांवर मडगावातील हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-08-यू-9705 हा टेम्पो ट्रॅव्हलर आमोणे, कुंकळ्ळी येथून आगोंदकडे जात असताना पारयेकट्टा खोला येथे लादीन कपेलजवळ बे्रक निकामी झाल्याने उलटला. जखमींना प्रारंभी काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचार केल्यावर पाच जणांना घरी पाठविण्यात आले. तर नऊ रुग्णांना पुढील उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविण्यात आल्याची माहिती काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. शांबा गावकर यांनी दिली.

गंभीर जखमी  झालेल्या अफीना कार्दोज (वय 49), रुमानियो फर्नांडिस (78), प्रीती डिसोझा (36), प्रेसीला कार्दोज (36), सुनीता बार्रेटो (42), फॅड्रीक फर्नांडिस (46), सेवेरिना कार्दोज (71), पेरपेत फर्नांडिस (31), रोस्टन फर्नांडिस (40) यांना  मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात आले. दाऊद नदाफ (बसचालक), एलिजाबेथ फर्नांडिस (83), आश्‍विना फर्नांडिस (32) व रोनन फर्नांडिस यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.