Mon, Feb 18, 2019 13:58होमपेज › Goa › राज्यावर ७ महिन्यांमध्ये १० हजार कोटींचे कर्ज

राज्यावर ७ महिन्यांमध्ये १० हजार कोटींचे कर्ज

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:35AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असून 2016-17 या आर्थिक वर्षाअखेरीस राज्यावर 12.39 हजार कोटी रुपये इतका कर्जाचा डोंगर आहे.  विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांत  10 हजार कोटी रुपये इतके कर्ज राज्य सरकारने वेगवेगळ्या माध्यमांतून उचलले असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. 

गोवा सरकारने केंद्र सरकारकडून व विविध माध्यमांतून कर्ज मिळविण्याचा धडाका लावला असून कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षी मे ते नोव्हेंबर या कालावधीत सरकारने  सहावेळा कर्जे घेतली असून ती सुमारे 10 हजार कोटी रुपयांची आहेत. ही सर्व कर्जे खुल्या बाजारातूून अधिक व्याज दराने घेतली गेली आहेत. 

राज्य सरकारने यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांतच 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनेसाठी 47.71 कोटी रुपये बाह्य अनुदानित प्रकल्पांतर्गत घेण्यात आले आहेत.