Thu, Jul 18, 2019 08:12होमपेज › Goa › १ लाख २०,९३१ जणांची रोजगार विनिमय केंद्रांत नोंद

१ लाख २०,९३१ जणांची रोजगार विनिमय केंद्रांत नोंद

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:32AM

बुकमार्क करा

पणजी :

राज्य रोजगार  विनिमय केंद्रात  1 लाख 20 हजार 931 जणांनी रोजगार प्राप्तीसाठी नाव नोंदणी केली आहे. मडगावच्या तुलनेत पणजी केंद्रात अधिक बेरोजगारांची नोंद झाली आहे, अशी माहिती कामगार व रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत  दिलेल्या लेखी उत्तरात उघड झाली आहे.

खंवटे यांनी उत्तरात नमूद केल्यानुसार, पणजी व मडगाव येथे राज्य रोजगार विनिमय केंद्रे आहेत. दोन्ही केंद्रांत मिळून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1 लाख 20 हजार 931 बेरोजगारांनी नावनोंदणी केली आहे. 63 हजार 818 पुरुषांनी तर  57 हजार 113 महिला बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंद केली आहे.

पणजी केंद्रात एकूण 76 हजार 470 जणांची नोंद असून यात 41 हजार 363  पुरुष तर 35 हजार 107 महिला बेरोजगारांचा समावेश  आहे. मडगाव केंद्रात 44 हजार 461 जणांची नोंद असून यात  22 हजार 455 पुरुष व 22 हजार 6 महिलांची नोंद आहे.