Tue, Jan 21, 2020 10:47होमपेज › Edudisha › MPSC : तयारी सामान्य विज्ञान विषयाची

MPSC : तयारी सामान्य विज्ञान विषयाची

Published On: Sep 10 2019 1:21AM | Last Updated: Sep 10 2019 1:21AM
प्रा. सुजित गोळे

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत’ घेण्यात येणार्‍या राज्यसेवा तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा या दोन्ही परीक्षांसाठी सामान्य विज्ञान विषय फक्त पूर्व परीक्षेपुरता मार्यादित आहे. असे असले तरी देखील हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षाचा विचार केल्यास अंदाजे 2013 सालच्या अगोदर बरेच उमेदवार हा विषय optional विषय म्हणून सोडून देत असे निदर्षनास येते की, या विषयावर ज्या उमेदवारांची पकड आहे. त्यांचाच पूर्व परीक्षेमध्ये निकाल समाधानकारक येतो. आजच्या लेखात आपण याविषयी चर्चा करणार आहोत. 

सामान्य विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात खालील गोष्टींचा समावेश होतो. 
1) भोतिकशास्त्र 2) रसायनशास्त्र 3) जीवनशास्त्र 4) आरोग्यशास्त्र.
मात्र, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार केल्यास जरी अभ्यासक्रमात सामान्य विज्ञान असा उल्लेख असला तरी दोन ते तीन प्रश्न हे तंत्रज्ञानावर आधारीत असतात.

भौतिकशास्त्र - भौतिकशास्त्र या घटकात पुढील काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता, गती, गतीविषयक समीकरणे व नियम, गरुत्वाकर्षण बल, दाब, विद्यूतधारा, उष्णता प्रकाश, ध्वनी, ऊर्जा, कार्य, शक्ती, चुंबकत्व इ. वरील ठोकळा घटकांबरोबरच  त्यामधील उपघटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उमेदवाराने अभ्यास करताना प्रथम मूलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात तद्नंतर या संकल्पनांवर आधारीत उदाहरणांचा अभ्यास करताना प्रथम मूलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात तद्नंतर या संकल्पनांवार आधारीत उदाहरणांचा अभ्यास करावा व त्यावरील गणिते सोडविण्याचा प्रयत्न करावा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्रकाश ध्वनी, गुरुत्वाकर्षण असे काही महत्त्वाचे घटक आहेत.

रसायनशास्त्र - यामध्ये प्रामुख्याने द्रव्य व वर्गीकरण, अणू व रेणू, आवर्तसारणी, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, जग कार्बनचे, आम्ल, आम्लारी व क्षार, किरणोत्सार रासायनिक अभिक्रिया, महत्त्वाची संयुगे, खनिजे व धातुके इ. वरील घटकांबरोबर त्यामधील उपघटकांचा अभ्यास उमेदवारांनी करावा. रसायनशास्त्राची व्यावहारीक व दैनंदिन उपयोगिता या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास आवर्तसारणी, संयुगे, आम्ल, आम्लारी व क्षार , कार्बन असे काही महत्त्वाचे घटक आहेत.

•जीवशास्त्र- यामध्ये प्रामुख्याने वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करणे गरजेचे असते. ढोबळपणे यामध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव होतो. पेशी, उती व प्रकार, सजीवांचे वर्गीकरण, शरीरशास्त्र (यामध्ये विविध संस्थांचा अभ्यास होतो. उदा. श्वसन, पचन इ.) पोषण, महत्त्वाच्या प्राण्यांचा अभ्यास, वनस्पतींचा अभ्यास इ. मागील काही वर्षांपासून जीवशास्त्र यावर विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची संख्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे उमेदवारांनी जीवशास्त्र या घटकांकडे विशेष लक्ष द्यावे.

आरोग्यशास्त्र- जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने आरोग्यविषयक व्याख्या स्पष्ट केलेली आहे, तसेच समाजामध्ये याविषयी जागृतता निर्मितीसाठी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो, याचाच एक भाग म्हणून आयोगाने आरोग्यशास्त्र हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यताः रोग व त्यांची लक्षणे, रोगांची कारके, लक्षणे, प्रकार, उपाययोजना, विशिष्ट रोगांविषयीची लस, औषध तसेच केंद्र/राज्य शासनाकडून होत असणारे कार्यक्रम यांचा समावेश होतो. अशाप्रकारे वरील अभ्यासक्रमाबरोबरच उमेदवारांनी याविषयी चालू घडामोडी व तंत्रज्ञान यास प्रामुख्याने प्राधान्य द्यावे. पुढील लेखात आपण नवीन विषयाचे नियोजन बघू.