गणित आवडत नाही? 

Published On: Sep 10 2019 1:21AM | Last Updated: Sep 10 2019 1:21AM
Responsive image


अपर्णा देवकर

शालेय दक्षेत अनेकांना गणिताची भीती वाटत असते. गणितातील आकडेमोड काहींच्या आकलनाबाहेर असू शकतात. त्यामुळे अन्य विषयांत चांगले गुण असताना गणितात मात्र काही विद्यार्थ्यी कच्चे राहतात. मात्र, करिअरसाठी गणितही हा तितकाच महत्त्वाचा विषय मानला जातो. 

शास्त्र असो किंवा बँकिंग सेक्टर असो गणिताशिवाय पर्याय नसतो. मात्र, काहींना गणितच समजत नसेल तर अशा मुलांनी काय करावे, असा प्रश्न पालकांना पडतो. दहावी किंवा बारावीपर्यंत गणित विषय घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक वाटा असतात. 

त्याचबरोबर गणिताशिवाय असणार्‍या वाटा देखील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहेत. ड्रेस डिझायनर, पत्रकारिता, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनर, फूड टेक्नॉलॉजी यामध्ये करिअरच्या असंख्य  संधी आहेत.  

आर्किटेक्चर : जर बारावीपर्यंत विद्यार्थ्याला गणितात चांगले गुण नसले तरी आर्किटेक्चर क्षेत्राची निवड करू शकतो. त्यासाठी नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट देणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. या परीक्षेत आर्किटेक्चरसंबंधीच्या ज्ञानाची माहिती विचारली जाते. तेथे खूप आकडेमोड असतेच असे नाही. ज्यांना आर्किटेक्टमध्ये करिअरच करायचे आहे, त्यांनी या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. 

इंटरेरियर डिझायनर : बारावीनंतर इंटरेरियर डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण इंटरेरियर डिझायनर होऊ शकतो. बांधकामाशी संलग्न विविध कंपन्यांत रोजगाराची संधी मिळते. तसेच स्वत:ची फर्मही सुरू करू शकतो. बेडरूम, हॉल, किचन आदींना सजवण्याचे काम इंटरेरियरचे असते. 

पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन : पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना गणिताची गरज नाही. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. पत्रकारितेत सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्याची गरज भासते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींच्या जोरावर करिअरचा मार्ग निवडू शकतो.