Thu, Nov 21, 2019 16:09होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Last Updated: Nov 12 2019 1:28AM
संकलन - ज्ञानदेव भोपळे

महाराष्ट्र राज्य परीक्षा - परिषदेमार्फत घेण्यात येत असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 19 जानेवारी 2020 रोजी होणार असून डी. एड. किंवा बी. एड. उमेदवाराकडून 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर माहिती mahatet.in येथे उपलब्ध.

आयबीपी एसमार्फत - सर्व राष्ट्रीयीकृत बँकांतील 1163 स्पेशालिस्ट ऑफिसर पदामध्ये आयटी ऑफिसर, अ‍ॅग्री, एचआर, राजभाषा, लॉ व मार्केटिंग पदासाठी संबंधित विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडून 26 नोव्हेंबर 2019 ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून ऑनलाईन पूर्व परीक्षा 28 व 29 डिसेंबर 2019 रोजी घेणेत येईल. अधिक जाहिरात ibps.in येथे उपलब्ध.

भारतीय नौदल - मध्ये 2700 सेलर-ए ए आणि सेलर एस एस आर पदासाठी 12 फिजिक्स व मॅथ्स उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत असून सविस्तर जाहिरात joinindiannavy.gov.in येथे उपलब्ध.

पंजाब नॅशनल बँक-मुंबई येथे 27 सफारी कर्मचारी पदांच्या भरतीकरिता 10वी नापास उमेदवाराकडून 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती pnbindia.in येथे उपलब्ध.

मुंबई महानगर प्रदेश विकास - प्राधिकरण  - मध्ये व्यवस्थापक, संचालक पदासाठी 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत असून अधिक माहिती mmrda.maharashtra.gov.in येथे उपलब्ध.

चलन नोट प्रेस - नाशिक येथे वकील पदासाठी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती cnpnashik.spmcil.com येथे उपलब्ध.

वस्त्र मंत्रालय - मुंबई येथे संचालक सहायक पदासाठी 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत असून सविस्तर माहिती textilesscommittee.nic.in येथे उपलब्ध.

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत  -21 प्रकारच्या गट ब आणि क पदांच्या 19 विभागातील हजारो पदांच्या भरतीकरिता पदवी प्राप्त उमेदवाराकडून 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती sss.nic.in येथे उपलब्ध.

सैन्य भरती - औरंगाबाद रजिस्ट्रेशन 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत करावयाचे असून भरती-13 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार आहे. अधिक माहिती indianarmy.nic.in येथे उपलब्ध.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन - मध्ये इन्चार्ज पदासाठी ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात  npci.org.in येथे उपलब्ध.

कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट - सी मॅट व ग्रॅज्युएट फॉर्मसी अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट-जीपॅट- परीक्षा 20 जानेवारी 2020 रोजी होणार असून ऑनलाईन अर्ज- 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. अधिक माहिती cmat.nta.nic.in, gpat.nta.nic.in येथे उपलब्ध.

संरक्षण सेवेमध्ये - अधिकारी होणेची संधी- सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था- एस पी आय- औरंगाबाद येथे एनडीए च्या प्रशिक्षण वर्गाच्या प्रवेशासाठी इ. 10 वीत शिकत असलेल्या उमेदवाराकडून 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज मागविणेत येत असून परीक्षा एप्रिल 2020 मध्ये कोल्हापूरसह इतर परीक्षा केंद्र होईल. अधिक माहिती spiaurangabad.com येथे उपलब्ध.