EDU दिशा : संधी नोकरीच्या

Published On: Jul 23 2019 1:15AM | Last Updated: Jul 22 2019 7:30PM
Responsive image

संकलन - ज्ञानदेव भोपळे


* महाराष्ट्र जलसंपदा विभाग- 982 कनिष्ठ अभियंता  स्थापत्य पदासाठी संबंधित डिप्लोमाधारक उमेदवाराकडून 15 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mahapariksha.gov.in येथे उपलब्ध.

* महाराष्ट्र अग्‍निशामक सेवा प्रवेश फायरमन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी- 10 वी 50 टक्के - प्रतिबंध अधिकारी - पात्रता - पदवी 50 टक्के उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mahapariksha.gov.in  येथे उपलब्ध.

* मध्य रेल्वे - भुसावळ (महाराष्ट्र) 31 स्टाफ नर्स पदासाठी थेट मुलाखत - 29 जुलै स. 10 वा. असून बीएस्सी नर्सिंग किंवा मिडवाईफ प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता असून अधिक माहिती indianralways.gov.in येथे उपलब्ध.

* महाराष्ट्र ज्ञान महामंडळामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी ऑनलाईन अर्ज - 24 जुलै 2019 पर्यंत मागविणेत येत असून मुलाखत - 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2019 या कालावधीत होणार आहे. अधिक माहिती mkcl.org/careers
येथे उपलब्ध.

* महाराष्ट्र शासन पोलिस शिपाई व चालक पोलिस पदांच्या पदसंख्येचा जीआर 19 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध झाला असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.

* महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी मेघा भरती होणार असून यामध्ये शिक्षक भरती, ग्रामविकास विभागात 13 हजार पदे, कृषी- 1585 पदे, वनसंरक्षक - 1500 पदे, सार्वजनिक बांधकाम - 435 पदे, जलसंधारण - 250 पदे, आरोग्य - 800 पदे, वित्त - 959 पदांचा समावेश आहे.

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे गट ब, क व ड च्या शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी 9 ऑगस्ट 2019 पर्यंत नोंदणी करणेचा कालावधी असून अधिक माहिती mahapariksha.gov.in  येथे उपलब्ध.

* एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्र. 2 हा अर्हताकारी (क्‍वालिफाईंग) स्वरूपाचा न ठेवता तो प्रचलित पद्धतीप्रमाणे पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांची गुणवत्ता ठरवण्यात यावा, असा निर्णय झालेला आहे.

* बँकांच्या परीक्षा आता मराठीसह इतर 13 प्रादेशिक भाषेत होणार. संभाव्य जाहिरात - हजारो प्रोबेशनरी ऑफिसर पदाकरिता पदवी प्राप्‍त उमेदवाराकडून ऑक्टोबर 2019 मध्ये होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येणार असून जाहिरात जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. ऑगस्ट 2019 मध्ये क्‍लोरिकल ग्रेडची जाहिरात प्रसिद्ध होईल.
 
* नवोदय विद्यालय समितीमध्ये- 2370 विविध शिक्षक, स्टाफ नर्स, असिस्टंट व लिपीक पदांकरिता 9 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात navodaya.gov.in  येथे उपलब्ध.

 * इंडियन ऑईल- 129 ज्युनि. इंजिनियर्स असिस्टंट पदाकरिता 4 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात iocl.com  येथे उपलब्ध.
 
* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळमध्ये- 41 सल्‍लागार पदासाठी 27 जुलै 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात cpcb.nic.in येथे उपलब्ध.