Tue, Jul 23, 2019 00:32होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Published On: Jul 09 2019 1:00AM | Last Updated: Jul 09 2019 1:00AM
• एमपीएसी राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्र. 2 हा अर्हताकारी (क्‍वालिफाईंग) स्वरूपाचा न ठेवता प्रचलित पद्धतीप्रमाणे पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांची गुणवत्ता ठरविण्यात यावा, असा निर्णय झालेला आहे.

• बँकांच्या परीक्षा आता मराठीसह इतर 13 प्रादेशिक भाषेत होणार - संभाव्य जाहिरात - हजारो प्रोबेशनरी ऑफिसर पदांकरिता पदवी प्राप्‍त उमेदवारांकडून ऑक्टोबर 2019 मध्ये होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येणार असून जाहिरात जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. ऑगस्ट 2019 क्‍लिरीकल ग्रेडची जाहिरात प्रसिद्ध होईल.

• नवोदय विद्यालय समितीमध्ये 2370 विविध शिक्षक, स्टाफ नर्स, असिस्टंट व लिपीक पदांकरिता 9 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात navodaya.gov.in येथे उपलब्ध.

• रयत शिक्षण संस्था 725 विविध शिक्षक पदांकरिता 10 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात rayatshikshan.edu येथे उपलब्ध.

• इंडियन ऑईल 129 ज्युनि. इंजिनियर्स असिस्टंट पदांकरिता 4 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात iocl.com येथे उपलब्ध.

• केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळमध्ये 41 सल्‍लागार पदांसाठी 27 जुलै 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात cpcb.nic.in येथे उपलब्ध.

• देशात पोलिसांच्या 5 लाख रिक्‍त - महाराष्ट्रात 26 हजार 195 जागा रिक्‍त - सदर माहिती गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार.

• माझगाव डाक शिपबिल्डर्स रिग्गर्स - 8 वी व आयटीआय इलेक्ट्रिशियन - 10 वी व आयटीआय उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 26 जुलै 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mazagondock.in येथे उपलब्ध.

• केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससी मार्फत घेत असलेल्या विविध 12 प्रकारच्या परीक्षांचे सन 2020चे वेळापत्रक जाहीर upsc.gov.in

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथे 102 असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी 15 जुलै 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात nagpuruniversity.org येथे उपलब्ध.

• तिन्ही सैन्यदलात - 78 हजार 291 पदे रिक्‍त -9427 पदे अधिकारी असलेची माहिती - लष्कर दल - 50, 312 पदे, नौदल - 11,557 आणि हवाई दल - 12,625 पदे - लवकरच तिन्ही दलांत रोजगाराची दालने उघडली जातील.

• पनवेल महापालिकेत विधानसभा निवडणुकीपूर्वी 1946 पदांची भरती प्रक्रिया जुलै 2019 मध्ये मंजुरी.

• महावितरणमध्ये 45,000 हून अधिक पदांची भरती होणार.

• आगामी संभाव्य जाहिराती - रिझर्व्ह बँक - असिस्टंट व ऑफिसर ग्रेड बी - महाराष्ट्र शासन पोलिस भरती.

संकलन - ज्ञानदेव भोपळे