आवश्यक डिजिटल स्किल्स

Last Updated: Nov 05 2019 12:51AM
Responsive image


महेश कोळी

आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनले आहे. लहान मोठ्या विविध कामांत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने सुलभता आली आहे. शिक्षण क्षेत्रातही ई-लर्निंग, एम-लर्निंगसारख्या तंत्रज्ञान एका नवीन क्रांतीच्या रुपाने समोर येत आहे. अशा स्थितीत डिजिटल स्किल्स सक्षम असणे गरजेचे झाले आहे.

आजघडीला अनेक क्षेत्रांत रिक्‍त जागा आहेत. मात्र, डिजिटल कौशल्य नसल्याने कंपन्यांना पात्र उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. जर आपण एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर नोकरी करू इच्छित असाल तर अ‍ॅकॅडेमिक नॉलेजबरोबरच स्वत:मध्ये डिजिटल स्किल्स देखील विकसित करण्याचा प्रयत्न करा. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनले आहे. लहान मोठ्या विविध कामांत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने सुलभता आली आहे. शिक्षण क्षेत्रातही ई-लर्निंग, एम-लर्निंगसारख्या तंत्रज्ञान एका नवीन क्रांतीच्या रुपाने समोर येत आहे. अशा स्थितीत डिजिटल स्किल्स सक्षम असणे गरजेचे झाले आहे. कारण हे कौशल्य विद्यार्थ्यांना करिअरसाठी निश्‍चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याबाबत आणखी काही जाणून घेऊ या.

हार्डवेअरची माहिती बाळगा : अलीकडच्या काळात कॉलेजकडून विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासेस आयोजित केले जात आहे. या क्लासमध्ये लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन आणि एआय-संचालित स्पीकर यांसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी हार्डवेअरची प्राथमिक माहिती बाळगणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानासंबंधी लहान मोठ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. नेटवर्कची असो किंवा प्रोसेसर, त्यातील अडचणी दूर करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. 

तांत्रिक भाषेचे ज्ञान : विद्यार्थ्यांना विविध डिजिटल उपकरण आणि प्लॅटफॉर्मच्या उपयोगासाठी आवश्यक असणार्‍या तांत्रिक भाषेचे आकलन असणे गरजेचे आहे. यामुळे संबंधित तज्ज्ञहा तातडीने तांत्रिक बिघाड दुरुस्त करू शकेल. उदा. एचटीएमएल, डोमेन, वेब सर्व्हर आणि यूआरएल सारख्या शब्दांचे आकलन असावे. या माध्यमातून संकेतस्थळ कसे काम करतात, हे लक्षात येते. 

कंटेटचे आकलन : इंटरनेट हे असे प्लॅटफॉर्म आहे. की तेथे विद्यार्थ्याला अभ्यासासाठी विविध प्रकारचे साधने उपलब्ध होते. मात्र, आपल्याला कोणता कंटेट उपयुक्‍त आहे, हे विद्यार्थ्याला समजायला हवे. एखादा कंटेट उपकरणाची अचूक माहिती देत आहे की नाही, का तो दिशाभूल करत आहे, याचे आकलन करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून उपयुक्‍त कंटेट मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठीचे कौशल्यही विकसित केले पाहिजे. 

कंटेट तयार करणे : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कंटेट तयार करणारे अनेक टूल्स उपलब्ध आहेत. हे टूल्स आपले असायनमेंट पूर्ण करण्यासाठी वापरता येऊ शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉक्यूमेंटस, स्प्रेडशीटस, पीपीटी, इन्फ्रोग्राफिक्स, ऑडियो आणि व्हिडीओ आदी तयार करता येतात. विद्यार्थ्यांना प्रासंगिक डेटा एकत्र करणे आणि योग्य तर्‍हेने त्याचे सादरीकरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

कम्युनिकेशन आणि कोलाबरेशन कौशल्य : आजच्या 21 व्या शतकात संवादात पूर्वीइतकी औपचरिकता राहिली नाही. या बदलामुळे विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करणे अत्यावश्यक झाले आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना सोशल मीडिया आणि अन्य प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे संवाद करणे गरजेचे बनले आहे. चांगले संवाद कौशल्य आणि टीम स्पिरीट हे आपल्या कोलेबोरटिव्ह स्किल्सला प्रोत्साहन देते. या माध्यमातून सहकारी मित्रात विश्‍वास निर्माण होतो आणि गटाच्या रुपातून एखादे टास्क कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करता येते. 

सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्रतिक्रिया या नव्या युगातील उमेदवाराच्या रिझ्युमेचा हिस्सा बनली आहे. या काळात भरती मंडळ उमेदवाराच्या ज्ञानाबरोबरच त्याच्या सोशल मीडियाच्या प्रतिमेलाही महत्त्व देत आहेत. आजकाल कंपन्या सभाव्य उमेदवाराचे आकलन हे सोशल मीडियातील प्रोफाईलवरून करत आहेत. याशिवाय लिंक्डेनसारख्या सोशल नेटवर्किंग साईट ही उमेदवारांना नोकरीचा शोध घेण्याचा माध्यम ठरत आहे. अशा स्थितीत एक चांगली ऑनलाईन इमेज तयार करणे आवश्यक बनले आहे. 

बॅकअप मजबूत असावा : क्लाऊड सर्व्हिसेससारखे आयक्लाऊड (केवळ अ‍ॅपल यूजरसाठी) ड्रॉपबॉक्स, गूगल ड्राईव्ह आणि अन्य क्लाऊस सर्व्हिस प्लॅटफॉम्सवर डेटाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे. या आधारावर आपण कोणताही डेटा कधीही आणि केव्हाही वापरू शकतो. आता प्रत्येक ठिकाणी हार्डडिस्कची गरज भासत नाही. याशिवाय या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्ड डिस्कची हानी होण्याची शक्यताही कमी झाली आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी क्लाऊड सर्व्हिसेसची माहिती जाणून घेणे गरजेचे बनले आहे. ही माहिती केवळ व्यावसायिक द‍ृष्टिकोनातून नाही तर व्यक्‍तिगत जीवनातही उपयुक्‍त ठरते. या क्लाऊड सर्व्हिसेसमध्ये आपण खासगी फोटो आणि अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांचा संचय करू शकतो.