Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Edudisha › एसी-रेफ्रिजरेशन तंत्रज्ञ बना!

एसी-रेफ्रिजरेशन तंत्रज्ञ बना!

Published On: Sep 04 2018 1:21AM | Last Updated: Sep 03 2018 8:14PMजगदीश काळे

आजघडीला एसी आणि रेफ्रिजरेशन क्षेत्रात दोन लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी आहेत. केवळ चार महिन्यांचा कोर्स करून आपण करिअर करू शकता. सध्या सर्वच कंपन्यांत कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. प्रशिक्षण देण्यासाठी कंपन्यांकडे वेळ नाही आणि या सर्वांना प्रशिक्षित कर्मचारीवर्ग हवा असतो. आपल्याला जर टेक्निकल फिल्डमध्ये रुची असेल तर अशा क्षेत्राची निवड करावी जेणेकरून प्रशिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ होण्याबरोबरच करिअरला योग्य दिशेने नेता येईल. 

भारत 2020 पर्यंत जगातील सर्वात तरुण देश बनण्याच्या मार्गावर आहे. साहजिकच अशा स्थितीत अधिकाधिक रोजगाराच्या संधी शोधणे ही भारतीयांची प्राथमिकता राहील. भारतातील शिक्षित युवक बेरोजगार राहण्यामागे केवळ कुशलतेचा अभाव हे कारण नाही तर रोजगाराभिमूख अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास प्रशिक्षणात मागे राहणे होय. आजकाल असे अनेक क्षेत्र आहेत की, त्यात नोकरी आहे, परंतु युवकांना त्याची फारशी माहिती नाही. जर या क्षेत्रात युवकांनी कठोर मेहनत केली तर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेशन हे अशाच प्रकारचे क्षेत्र आहे. एका अंदाजानुसार या क्षेत्रात दोन लाखांहून अधिक प्रशिक्षित नागरिकांची गरज भासणार आहे. यासाठी आपण या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता. 

उमेदवारांना प्रशिक्षण : एसी आणि रेफ्रिजरेशन क्षेत्रात सध्याच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात कुशल कर्मचार्‍यांचा आणि कामगारांचा अभाव आहे. हा गॅप भरून काढर्‍यासाठी ‘इसरे’ संघटन प्रयत्नशील आहे. या शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येते. इसरे  ही हिटिंग, व्हेंटिलेशन एसी आणि रेफ्रिजरेशनच्या क्षेत्रातील आघाडीची टेक्निकल सोसायटी आहे. इसरे इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलंन्स (आयआयई) एसी आणि रेफ्रिजरेशनच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून प्रशिक्षण देत आहे. इसरे आपल्या सर्टिफाईड प्रोफेशनल प्रोग्रॅम (आयसीपी)च्या माध्यमातून व्यावसायिक आणि एंट्री लेव्हल प्रोग्रॅमच्या माध्यमातून या क्षेत्रात नवीन उमेदवारांना प्रशिक्षण देऊन एक यशस्वी करिअर करण्यासाठी हातभार लावते. सध्याच्या काळात या क्षेत्रात प्रशिक्षण प्राप्त करून चांगले पैसे कमावता येणे शक्य आहे. 

कुशल तंत्रज्ञांचा अभाव : उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपल्या जुन्या एसीची सर्व्हिसिंग करण्यासाठी किंवा नवीन एसी बसवण्यासाठी तंत्रज्ञाला पाचारण करण्यात येते. मात्र, तो अधिक पैसे का घेतो, याचा कधी विचार केला आहे का? किंवा अनेकदा तो येण्यासही नकार देतो. कारण यामागे अनेक कारणे आहेत. 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुशल तंत्रज्ञांचा अभाव. दुर्दैवाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलने देखील एसी आणि रेफ्रिजरेशन क्षेत्रातासाठी वेगळे सेक्टर स्किल कौन्सिलची निर्मिती केली नाही. एसी किंवा रेफ्रिजरेशन क्षेत्रात मेहनत केल्यास आपण वेगाने प्रगती करू शकता. 

नोकरीच्या संधी : ‘इसरे’च्या प्रमाणपत्र व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळू शकतो. मग क्लिनरुम सर्टिफिकेशन, एअर कंडिशनिंग डिझाईन आणि एअर कंडिशनिंग सर्व्हिस आणि कमिशनिंग प्रशिक्षण घेऊ शकता. आपण इसरे इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सपासून ते चार महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स्ड इंजिनिअरिंग डिप्लोमा देखील करू शकतो. इसरेपासून अभ्यासक्रम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला नोकरीसाठी भटकंती करावी लागत नाही. इसरे दरवर्षी जॉब जक्शन प्रोग्रॅम आयोजित करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी. जॉब जंक्शन प्रोग्रॅममध्ये एम्प्लॉयरला नोकरी देण्यासाठी थेट संपर्क केला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला पात्रता सिद्ध करावी लागेल आणि यानुसार आपण नोकरी मिळवू शकता.