होमपेज › Crime News › कराड : सोळवंडे खून प्रकरणी आठ संशयित गजाआड

कराड : सोळवंडे खून प्रकरणी आठ संशयित गजाआड

Published On: Aug 22 2019 5:24PM | Last Updated: Aug 22 2019 5:24PM

सोळवंडे खून प्रकरणी आठ संशयित गजाआडकराड : प्रतिनिधी

येथील खंडणी प्रकरणातील संशयित पवन सोळवंडे याच्या खूनप्रकरणी कराड पोलिसांनी आठ संशयितांना गजाआड केले आहे. या संशयितांना न्यायालयात सादर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे पोलीसांनी आवाहन केले आहे. काही शंका असल्यास थेट संपर्क साधण्याचे पोलीसांनी नागरिकांना केले आहे.

मंगळवारी मध्यरात्री पवन सोळवंडे यांच्यावर कराड नगरपालिका इमारतीच्या परिसरात संशयित आरोपींनी बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात पवनचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून कराडात तणावाचे वातावरण कायम आहे. जाळपोळ व मोडतडीसह दगडफेकीच्या प्रकारामुळे बुधवारी दिवसभर कराडमध्ये अघोषित बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी (ता. २३) कराडमधील जनजीवन पूर्वपदावर येण्याची अपेक्षा होती. मात्र गुरूवारी सकाळी काही अफवा पसरल्या आणि बुधवार पेठेत पुन्हा जमाव संतप्त झाला होता. 

दरम्यानच्या कालावधीत काही युवक दुकाने बंद करण्यासाठी कराड शहरातून फिरत होते. त्यामुळेच बसस्थानक परिसरात दुकाने बंद करण्यात आली. मात्र हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. तर काहींनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. त्यामुळेच सलग दुसर्‍या दिवशीही कराडात तणावपूर्ण शांतता कायम होती.