जीव घेणारा समाज

Last Updated: Dec 18 2019 1:16AM
Responsive image


जगदीश काळे

सध्या समाजात गुन्हेेगारी वेगवेगळ्या प्रकारे फोफावते आहे. याला वैयक्तिक राग, संपत्तीचा वाद आणि प्रेमप्रकरण, अशी अनेक कारणे आहेत. प्रेमसंबंधातून आणि विवाहाशी संंबंधित कारणांमुळे हत्यांचा आलेख वाढतोय, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालाने सिद्ध झाले आहे.

आपल्या देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांमध्ये खूनप्रकरणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आणि या घटनांमध्ये प्रेमप्रकरणातून होणार्‍या खुनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 2001 ते 2017 या कालावधीत सर्वाधिक खुनांचे प्रकार हे प्रेमप्रकरण आणि विवाहाशी संबंधित आहेत. या सवर्र् प्रकरणांमागे वैयक्तिक राग, संपत्तीचा वाद आणि प्रेमप्रकरण, ही तीन कारणे आहेेत. वैयक्तिक राग आणि संपत्तीतील वाद या दोन प्रकरणांमध्ये होणार्‍या हत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मात्र, आशादायक बाब ही, गेल्या काही वर्षांत या घटनांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. 2001 तेे 2017 या कालावधीत झालेल्या पाहणीत वैयक्तिक रागातून झालेल्या खूनप्रकरणात 4 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे संपत्तीच्या वादातून घडणार्‍या हत्यांच्या घटनाही 12 टक्क्यांनी घटल्या आहेेत. मात्र, हे सवर्र् आशावादी घडत असताना, प्रेमप्रकरणातून होणार्‍या हत्यांच्या प्रमाणात 28 टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या प्रेमप्रकरणातून घडणार्‍या हत्या म्हणजेे सामाजिक मूल्ये ढासळत असल्याचे द्योतक आहेत. आपल्या देशाने अनेक क्षेत्रांत क्रांती केली आहे. देश विकासाच्या पथावर वाटचाल करीत आहे. मात्र, देशातील समाजमन आजही जुन्या रूढी-परंपरांमध्येच अडकले आहे. आपल्या समाजात आजही प्रेम करण्यास स्वातंत्र्य नाही. मात्र, गेल्या काही दशकांपासून सामाजिक-आर्थिक विकासामुळे समाज काही प्रमाणात बंधनमुक्त होताना दिसत आहे. पुरुषांबरोबर आता स्त्रियांना व मुलींना शिक्षण व नोकरीसाठी घराच्या बाहेर पडण्या स्वातंत्र्य मिळाले आहे. मुले व मुुली एकमेकांना भेटण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, अजूनही हवा तसा समाज बदललेला नाही. आजही जातीय व सांप्रदायिक बंधने पूर्वीइतकीच मजबूत आहेत. अद्यापि आपला समाज जुन्या बुरसटलेल्या विचारांमध्ये अडकून पडला आहे. पुरुषप्रधान समाजाचे विचार आजही बदलेले दिसत नाहीत. अनेक बाबतींत हे सिद्धही झाले आहे. समाजात प्रेमप्रकरणातून घडणार्‍या खुनांच्या घटनांमध्ये प्रेमत्रिकोण किंवा एकतर्फी प्रेह हेही एक कारण आहे. या प्रकरणात स्त्रीने जर एखाद्या पुरुषाचा प्रेमप्रस्ताव फेटाळून लावला, तो प्रेमांध पुरुष त्या स्त्रीची किंवा तिच्या प्रियकाराची हत्या करण्यास प्रवृत्त होतो.

सध्या देशातील अनेक भागांत प्रेमप्रकरणातून घडणारा प्रकार म्हणजे, ‘ऑनर किलिंग’. या प्रकरणात मुलीने किंवा मुलाने आई-वडील, नातेेवाईक, समाज आणि जात-धर्म यांच्याविरोधात जाऊन प्रेम अथवा लग्न केल्यास यात त्या मुलाचा किंवा मुलीचा व काही वेेळा दोघांचा जीव घेतला जातो. विशेषकरून मुलींच्या बाबतीत अशा घटना अधिक घडताना दिसतात. कारण आपल्या समाजात आजही मुलीला ‘इज्जत’ समजली जाते.  

एका पाहणीत असे आढळले की 2005 ते 2012 या काळात घडलेल्या हत्येच्या 44 टक्के घटनांचे कारण आंतरजातीय विवाह हे आहे. त्यातही 56 टक्के घटना या मुलाने किंवा मुलीने घेतलेला निर्णय कुटुंबातील सदस्यांना मान्य नसल्याने घडल्या आहेत. ज्या समाजात एखाद्याचा जीव घेऊन आदर-सन्मान मिळतोे, अशी धारणा आहे, त्या समाजाला आपण आधुनिक-सभ्य कसे काय म्हणू शकतो? खरेच आज आपल्याला आधुनिक समाज घडवायचा असेल, तर स्त्री-पुरुषांना एवढे स्वातंत्र्य दिले पाहिजे की, भयमुक्त होऊन त्यांनी आपल्या जीवन जगले पाहिजे.