Sat, Jun 06, 2020 12:02होमपेज › Bhumiputra › ज्वारीची लागवड करताना...

ज्वारीची लागवड करताना...

Published On: Sep 10 2018 10:12PM | Last Updated: Sep 10 2018 10:12PMरब्बी हंगामात ज्वारीची लागवड करताना शेतकर्‍यांनी ज्वारीची सुधारित जात निवडावी. फुले एसएसएफ 733 या जातीचे पीक तीन महिन्यांत येते. या जातीचे उत्पादन प्रति हेक्टरी 13 ते 30 क्विंटल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही जात लागवडीस चांगली आहे. जिरायत क्षेत्रात या जातीच्या पिकातून चांगले उत्पन्‍न मिळते. फुले एसएसएफ 733 बरोबरच एसएसएफ 658 ही जातही चांगले उत्पन्‍न देणारी आहे.

या जातीतून हेक्टरी 14 ते 15 क्‍विंटल एवढे उत्पन्‍न मिळते. भीमा ही जात सव्वातीन महिन्यात तयार होते. भीमा जातीच्या ज्वारीतून हेक्टरी 16 क्‍विंटल उत्पादन मिळते. डीएसएच 129 या जातीचे पीक 130 दिवसांत मिळते. या जातीतून हेक्टरी 18 ते 20 क्‍विंटल एवढे उत्पादन मिळते. त्याचबरोबर एसएसएफ 708 ही जात 115 ते 120 दिवसांत तयार होते. पेरणीपूर्वी जमिनीत जलसंधारण करावे. जमिनीमध्ये उतारानुसार सपाट वाफे तयार करावेत. बळीराम नांगराच्या सहाय्याने दंड टाकावेत. 15 सप्टेबर ते 15 ऑक्टोबर या काळात पेरणी करावी.