ऊस रोपे आधुनिकीकरण

Published On: Mar 19 2019 12:28AM | Last Updated: Mar 18 2019 8:15PM
Responsive image


तृप्ती हावळ

प्रगतशील शेतकरी स्वतःच्या शेतातच थोड्या जागेत ऊस रोपे तयार करतो. यासाठी लागणारे कोकोपीट कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतेच. शिवाय असेही कोकोपीट बाजारात आले आहे. ज्यामध्ये ऊस चांगल्या पद्धतीने व निरोगी उगवण व्हावी यासाठीची खतेही मिक्स आहेत.

कोल्हापूर जिल्हा हा ऊस पिकासाठी पहिल्या क्रमांकावर आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण 80 टक्के शेतकरी ऊस पीक घेताना इथे दिसतात. ऊस लागणीचे तीन प्रमुख हंगाम मानले जातात. 

सुरू हंगाम- 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी
पूर्व हंगाम- 15 ऑक्टोबर ते 15 सप्टेंबर
आडसाली-15 जुलै ते 15 ऑगस्ट
खाडवा पहिले पीक गेल्यानंतर

पूर्वापार चालत आलेली सरीमधील उसाची एकामागे एक अशी काही लावण पद्धत जवळजवळ घेतल्यावर जास्तीत जास्त फुटवा मिळतो व जास्त फुटव्यांमुळे उत्पादनही जास्त मिळते. ही पद्धत ही आता खूप मागे पडलेली दिसते. आताचा हुशार शेतकरी 4 फुटांची सरी ठेवून 2 ते 2.50 (दोन ते अडीच) फुटाला एक डोळा किंवा रोपाची लागण करतो. याप्रकारे एकरी 6 ते 7 हजार इतकी रोपे पुरेशी होता. शिवाय फुटवा न होता एका ऊस रोपाला 10 ते 12 इतकेच फुटवे ठेवतो. यामुळे खतांची मात्रा प्रत्येक फुटव्याला चांगली मिळून प्रत्येक फुटव्यांचे (उसाचे) वजन 2 ते अडीच किलो इतके भरते. म्हणजेच एकरी 80 ते 100 टन  ऊस उत्पादन मिळतेच पण नियोजन करून प्रत्येक वर्षी  माती  परिक्षण करून भरमसाठ फक्‍त रासायनिक खते न वापरता माती परिक्षणानुसार जमिनीत कमतरता असलेली रासायनिक खत मात्रा निवडावी. त्याबरोबर सुक्ष्म मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य, बायकोन्यूट्रियन्ट खते असा परिपूर्ण ऊस डोस तयार करून ऊस लागण केली जावी.

सर्व घटक (सर्व प्रकारची खते) जमिनीला मिळाल्यामुळे 30-40 टक्के उत्पादनात फरक पडतोच. शिवाय जमिनीची सुपीकताही वाढते. काही अंतराने सेंद्रिय कर्ब असलेली खते शेणखत यासारख्या खतांचा वापर करून जमिनीचा सामू ही चांगला ठेवता येतो. प्रगतशील शेतकरी स्वतःच्या शेतातच थोड्या जागेत ऊस रोपे तयार करतो. यासाठी लागणारे कोकोपीट कृषी सेवा  केंद्रामध्ये मिळतेच. शिवाय असेही कोकोपीट बाजारात आले आहे. ज्यामध्ये ऊस चांगल्या पद्धतीने व निरोगी उगवण व्हावी यासाठीची खतेही मिक्स आहेत. शेतकर्‍याला कोकोपीट व खते वेगवेगळी घेऊन तयार होणारे मिश्रण थोडे खर्चिक व कष्ट जास्त देणारे  असल्याने असे तयारच कोकोपीट इनसिटी मिक्‍चर (एनएम) या नावाने बाजारात मिळते. साध्या कोकोपीटमधील व एनएम कोकोपीटमधील रोपांमध्ये फरक दिसून येतो. मुळ्यांची चांगली वाढ झालेली दिसते. रोपे एकसारखी व टवटवीत दिसतात. ऊस डोळा कोकोपीटमध्ये लावण्याआधी ह्युमिक अ‍ॅसिड व बाविस्टीन (बुर्शीनाशक) मध्ये बुडवून अर्धा तास गोणपाटावर घालवून ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये लावल्यास साध्या मुळ्याबरोबर पांढर्‍या मुळांची ही चांगली वाढ झालेली दिसते. शिवाय आपण क्षमता ही 90 ते 95 टक्के होते. बियाणेच रोगमुक्‍त व चांगले असेल तर रोपे ही चांगलीच निपजतात व यापासून येणारे पीकही चांगले उत्पादन देणारे असते. या कॉकोपोटची रोपे जोमाने वाढतात. शिवाय एकसारखी असतात. ऊस डोळे लावणीसाठी बाजारामध्ये 60, 42, 70 कप्पे ट्रे उपलब्ध आहेत.

ऊस डोळा काढणीसाठी पूर्वी कोयत्याचा उपयोग करत असत. कोयत्याने उसातले 3-4 ऊस चिंबत तर कधी डोळ्याला इजा होऊन ऊस कांडी पेरणीसाठी योग्य नसे पण आता खूप सोपी सोयीस्कर व चांगली ऊस डोळा काढणी मशिन व्यापारी पेठेत आली आहेत. ज्यामुळे एकाच वेळी पूर्ण ऊस डोळा निघून ट्रेमध्ये बसविल्यास सोपे जाते. कोयत्याने दोनवेळा ऊस डोळा काढावा लागत असे व या आधुनिक मशिनने 3 सेकंदात एक डोळा निघतो. 

शिवाय नर्सरीसाठी किंवा जास्त लावण असेल व जास्त डोळे लागत असतील तर शेतकर्‍यास बसून ऊस डोळा काढणी मशिनही व्यापारी पेठेत आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कष्ट कमी व लवकर काम करणे सोपे जाते. ऊस रोपे चांगली निपजतात व उत्पादन वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

शेतकरी वर्गाने स्वतः तयार केलेले रोपे व विकत खरेदी केलेली रोपे यातील जमाखर्चाचा अभ्यास करूयात.

एकरी रोपे- 7000
70 कप्पी ट्रे एकरी ट्रे 10 रु. 1 + 100 नग   1000
कोकोपीट (छच)
200 कि. ग्रॅ.- 250 कि. ग्रॅ. 
एकरी 8 बॅग-  1200 रु. 
ऊस डोळा काढणी मशिन 600 पासून 900 पर्यंत
ट्रे- 1000 रु. + कोकोपीट 1200 + मशिन 700                                    + ह्यूमिक 125 + बाविल्टीन 100
एकूण- 3120 ते 3200 रु. पर्यंत एकरी खर्च होतो. 

विकत खरेदी केलेली रोपे 1 ऊस रोपास 2 ते 2.20 पैसे एकरी 6 ते 7000 रोपे-
7000 रोपे द 2 = 14000 रु. इतका खर्च येतो. 
मग शेतकरी वर्गाने नफा तोटा स्वतःचा स्वतःच शोधावा. शेतकरी वर्ग आता प्रगतीच्या वाटेवर आहेत. त्यांना माहिती मिळावी यासाठी ही माहिती देत आहे. ऊस रोपे आधुनिकीकरण व जमा खर्च देत आहे. तरी आपली प्रगती आपणच करून घ्यावी.