बारमाही उत्पन्‍नाची हमी देणारी काकडी

Published On: Mar 19 2019 12:28AM | Last Updated: Mar 18 2019 8:09PM
Responsive image


दत्ता पाटील

बारमाही उत्पन्‍न देणारी वेलवर्गीय फळ म्हणून काकडीकडे पाहिले जाते. राज्याच्या सर्वच भागात या पिकांचे उत्पादन घेतले जाते. काकडीमध्ये 86 टक्के  पाण्याचा भाग असल्याने उन्हाळ्यामध्ये काकडीचा वापर अधिक केला जातो. पश्‍चिम महाराष्ट्रात उसामधून आंतरपीक म्हणून काकडीचे पीक घेतले जाते. काकडीमध्ये पोटॅशिअम, सोडियम, लोह फॉस्फरस लोह यांचे प्रमाण अधिक  असते.  त्यामुळे मनुष्याच्या शरीराला काकडी पोषक आहे. 

काकडीच्या लागवडीसाठी अनेक सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यामध्ये हिमांगी, शीतल, पुसा संयोगपाईनसेर, फुले प्राची, फुले शुभांगी, पुना रिवरा आदी जातींचा समावेश आहे. काकडीच्या लागवडीसाठी हलकी-मध्यम व निचर्‍याच्या जमिनीची गरज असते. हलक्या जमिनीमध्ये पीक लवकर पक्‍व होते.  पाणी साचणार्‍या जमिनीमध्ये हे पीक येत नाही. उष्णता, भरपूर सूर्यप्रकाश, हवेतील आद्रता कमी असे हवामान पिकांच्या वाढीस पोषक असते. 30 ते 35 अंश तापमानात पिकाची वाढ  चांगली होते. हवामान योग्य नसल्यास काकडीवर करपा व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. 

कमी पावसाच्या प्रदेशात कधीही लागवड फायदेशीर ठरते. काकडीची लागवड सरी पद्धत किंवा वाफे पद्धतीने केली जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी असल्याने सरीमध्ये लागवड न करता सरींच्या वरच्या बाजूस बी-टोकण पद्धतीने लागवड केली जाते. जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे साध्या पद्धतीने टोकण केली जाते. एकरी दोन किलो बियाणे याकरिता पुरेसे आहे. 

कृषी अभ्यासकांच्या मते शेणखत हेक्टरी 25 टन, सोबत 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरदची मात्रा पेरणीच्यावेळी आवश्यक आहे. खते बुंध्यावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. काकडी पिकासाठी आठड्यातून एकदा पाणी देणे आवश्यक  आहे. या पिकामध्ये आंतरपीक घेतले जात नाही किंवा घेऊ नये. काकडीमध्ये नर फुले व मादी फुले वेगवेगळी येतात. 

नर फुलांचे प्रमाण अधिक असते. फळे येण्यासाठी मादी फुलांची अधिक गरज असते. याकरिता संजीवकाचा वापर करून मादी फुलांची संख्या वाढविता येते. उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांत फळे काढणीस तयार होतात.  फळे येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर तीन दिवसांनी तोडणी करून बाजारपेठेत पाठविणे गरजेचे आहे. याकरिता उत्तम नियोजन केल्यास हे पीक आर्थिकद‍ृष्ट्या फायदेशीर आहे. केवळ उत्पादन न घेता उत्पादित मालाला बाजारपेठ मिळविणे हेही महत्त्वाचे आहे. साधारणतः हेक्टरी 60 ते 70 क्‍विंटल उत्पादन काकडीचे मिळते.
 चिंतामुक्त होऊन जयंत पाटलांनी सांगलीकरांना दिली मोठी बातमी!


पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी


नागपूर : 'डॉ. आंबेडकर जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी होणार नाही'


अहमदनगर : मुकुंदनगर, आलमगीर, नाईकवाडपुरा आणि जामखेड शहर कोरोना हॉटस्पॉट जाहीर


नागपुरात ६ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले


रत्नागिरी : साखरतरमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह


मालेगावात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह


राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!


कोरोनाबाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन; गृह मंत्रालयाचा निर्णय!


महाबळेश्वर : संचारबंदीची 'ऐशी की तैशी' करणाऱ्या येस बँक गैरव्यवहारातील वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल