Sat, Feb 16, 2019 01:18होमपेज › Bhumiputra › कोरफड लागवडीतून अर्थार्जन

कोरफड लागवडीतून अर्थार्जन

Published On: Feb 12 2019 1:11AM | Last Updated: Feb 11 2019 8:23PM
कोरफड (अ‍ॅलोव्हेरा) या औषधी वनस्पतीचा वापर अनेक दुर्धर आजारांवरील उपचारासाठी केला जातो. त्यामुळे अलीकडच्या काळात औषध कंपन्यांकडून तसेच सौंदर्यप्रसाधने उत्पादक कंपन्यांकडून कोरफडीला असलेली मागणी वाढली आहे. त्यामुळेच कोरफडीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. या पिकातून शेतकर्‍याला चांगले उत्पादन मिळू शकते. त्यासाठी कोरफडीच्या लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान शेतकर्‍याने जाणून घेतले पाहिजे. पाणीटंचाईच्या काळात कोरफडीसारखे पीक शेतकर्‍यांसाठी सशक्‍त आणि प्रभावी पर्याय ठरू शकते. मात्र, या पिकातून उत्पन्‍न मिळते हेच अनेक शेतकर्‍यांना ठाऊक नाही. वास्तविक आपण फारशी गुंतवणूक न करता अन्य नगदी पिकांएवढेच उत्पन्‍न कोरफडीमधून मिळवू शकतो.