Fri, Nov 16, 2018 15:06होमपेज › Belgaon › अनगोळच्या महिलेची सौदीमध्ये विक्री?

अनगोळच्या महिलेची सौदीमध्ये विक्री?

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

परिस्थितीचा गैरफायदा घेत कँप येथील एजंटाने गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवून अनगोळ येथील  झरिना कुतुबुद्दीन संगोळी या महिलेची सौदी येथे  घरकामासाठी म्हणून पाठवून देण्याचे सांगून तिची 10 लाखांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तशी तक्रार झरिनाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. ’आपल्या आईची सुटका करा,‘  अशी मागणी झरिनाची मुलगी शैनाज व नातलगांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.

अनगोळ रघुनाथ पेठ येथील रहिवासी असणार्‍या झरिना संगोळी (वय 39) यांच्या पतीचे  निधन झाले आहे.  घर चालविण्यासाठी कामाच्या शोधात असणार्‍या झरिना यांची कँप येथील वहिदा मकानदार व शमशुद्दीन मकानदार या दाम्पत्याचा संपर्क झाला. मकानदार हे सौदी येथे कामगारांना पाठविण्याचे काम करतात. सौदी येथे घरकामासाठी मोठा पगार दिला जातो. केवळ चार जणांचे काम करावे लागणार आहे. यासाठी 20 हजार पगार दिला जाणार आहे, असे झरिनाला सांगण्यात आले. 
यावर विश्‍वास ठेवून फेब्रुवारी 2017 मध्ये तिला दिल्लीमार्गे सौदीला पाठविण्यात आले.