Tue, Nov 20, 2018 03:33होमपेज › Belgaon › बेळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

बेळगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:42PMबेळगाव ः प्रतिनिधी

भवानीनगर येथी आशिष उत्तम रजपूत (वय 16) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

मंगळवारी शहापूर नार्वेकर गल्ली येथील साहिल संतोष कोलवेकर या तरुणाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आशिषने आत्महत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

या प्रकरणाची वडगाव ग्रामीण पोलिसांना सायंकाळी माहिती मिळाली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.  बुधवारी आशिष नेहमी प्रमाणे शाळेला जाऊन आला होता. त्यानंतर त्याला घरच्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष दे असे सांगितले. त्यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केली.