Wed, Nov 14, 2018 03:45होमपेज › Belgaon › मन्सापूरचा तरुण मलप्रभा नदीत बुडाला

मन्सापूरचा तरुण मलप्रभा नदीत बुडाला

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:35AMखानापूर : वार्ताहर

मलप्रभा नदीवरील असोगानजीकच्या पूलवजा बंधार्‍यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेला मन्सापूर येथील तरुण नदीत बुडाला आहे. मारियान मोंतेस सोज (वय 26) असे तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी सायंकाळी मारियान आपल्या दोन मित्रांसह असोगा तीर्थक्षेत्राच्या जवळील पूलवजा बंधार्‍यावर खेकडे पकडण्यासाठी गेला होता. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी गळ टाकून बसले होते. यापैकी मारियान बंधार्‍यावर होता. अचानक तो नदीपात्रात पडला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने काही क्षणातच मित्रांच्या डोळ्यादेखत प्रवाहाबरोबर वाहून गेला. घटनेची माहीती खानापूर पोलीसांना मिळताच त्यांनी अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर मलप्रभेच्या पात्रात शोध  घेतला. पण शनिवारी उशिरापर्यंतठावठिकाणा नलागल्याने पोलीसांनी चापगाव, वड्डेबैल येथील बंधार्‍यांच्या परिसरात शोध चालविला आहे.

मारीयान हा गोवा येथे गवंडी कामाला होता. वर्षभरापूर्वी तो मन्सापूर येथे आला होता. त्याला वारंवार फिटस् येत होत्या. डॉक्टरांनी  त्याला पाण्याचा प्रवाह, आणि आगीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र बंधार्‍यावरन प्रवाहत गळ टाकून खेकडे पकडण्याच्या मोहात ही दुर्घटना घडली असल्याची माहीती त्याच्या मित्रांकडून मिळाली.