Sun, Aug 18, 2019 21:04होमपेज › Belgaon › कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

यमकनमर्डी : वार्ताहर 

 कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने हंचिनाळ (ता.हुक्केरी) येथील एका शेतकर्‍याने शेतवडीतील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. यमकनमर्डी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. अशोक निंगप्पा रेवणकर (वय 39) असे त्याचे नाव आहे. त्याने उळागड्डी खानापूर, विजया बँक, स्टेट बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, हत्तरगी येथील गायत्री सोसायटी, यमकनमर्डी येथील रेवणसिध्देश्‍वर सोसायटी आदी आस्थापनातून कर्ज घेतले होते. मात्र त्याची फेड करणे शक्य न झाल्याने तो काही दिवसांपासून चिंताग्रस्त होता. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.