होमपेज › Belgaon › बारावी इंग्रजी पेपरमध्ये ३० गुणांचे प्रश्‍न सदोष

बारावी इंग्रजी पेपरमध्ये ३० गुणांचे प्रश्‍न सदोष

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या बारावीच्या (पीयुसी द्वितीय वर्ष) इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल 30 गुणांचे प्रश्न व्याकरणदृष्ट्या सदोष असल्याचे आढळून आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे सार्‍याच विद्यार्थ्यांना कृपांक देण्याची मागणी तज्ज्ञांनी केली आहे.

प्रश्नपत्रिकेत  विषयाशी विसंगत प्रश्नही विचारण्यात आल्याचा आरोप तज्ज्ञांनी केला. व्याकरणदृष्ट्या प्रश्न सदोष असून यातून विद्यार्थ्यांना अर्थबोध झालेला नाही. प्रश्नपत्रिकेतच चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याकडून योग्य उत्तराची अपेक्षा करणे चुकीचे आहे. एकाच उत्तराचे दोन-तीन प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले आहेत. अलीकडच्या काळात इतकी निकृष्ट आणि चुकीची प्रश्नपत्रिका पाहावयास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पदवीपूर्व शिक्षण खात्याने आदर्श उत्तरपत्रिका खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. याबाबतचे आक्षेप मंगळवारपर्यंत मागविले होते.भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतदेखील तीन प्रश्न विद्यार्थ्यांना आकलन न होणारे होते. त्यामुळे कृपांक देण्यात यावेत अशी मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात आली. कृपांक देण्याबाबत तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. त्याचबरोबर विषयतज्ज्ञ शिक्षकांचा सल्ला घेण्यात येणार आहे. त्यांच्या व समितीच्या अहवालानुसार कृपांक गुण देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

 

Tags : belgaon, belgaon news, 12th standard paper, wrong question,