Thu, Apr 25, 2019 21:30होमपेज › Belgaon › पोस्टातील महिला कर्मचार्‍याला अटक 

पोस्टातील महिला कर्मचार्‍याला अटक 

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMबेळगाव : प्रतिनिधी

पोस्ट कार्यालयातील महिला कर्मचार्‍याकडून नागरीकांच्या पैशाची  अफरातफर केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कांचना विठ्ठल दफेदार (वय 47  रा. पांगुळ गल्ली) या कर्मचारी महिलेला अटक केली आहे. एपीएमसी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या कैलासनगर येथील पोस्ट कार्यालयात असणार्‍या कांचना  कार्यरत आहेत. पैशाची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोस्ट कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अटकेनंतर त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले.