Sat, Feb 23, 2019 00:30होमपेज › Belgaon › बेळगाव : ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

बेळगाव : ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Published On: Jan 24 2018 6:30PM | Last Updated: Jan 24 2018 6:05PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकी वर बसलेली महिला सुजाता परशुराम कारगी (वय ४५ रा.देवांगनगर, वडगाव) जागीच ठार झाली. तर दुचाकी चालक बसवराज सिद्धप्पा कारगी (वय ५५) जखमी झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, सायंकाळी चार च्या सुमारास आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त कारगी दाम्पत्य खरेदीसाठी दुचाकीवरुन निघाले होते. शहरात जुने पी.बी.रोडवर हिंद इंजिनिअरींग जवळ आले असता भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये सुजाता कारगी यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.