Tue, Sep 25, 2018 11:03होमपेज › Belgaon › एकूण अधिकारी ६, धाडी २४ ठिकाणी

एकूण अधिकारी ६, धाडी २४ ठिकाणी

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:03AMबंगळूर : प्रतिनिधी

किरण सुब्बाराव यांच्यासह एकूण सहा भ्रष्ट अधिकार्‍यांवर एसीबीने मंगळवारी पहाटे छापे घातले. तब्बल 24 ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. त्यातून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. मात्र, नेमका आकडा भ्रष्टाचारविरोधी दलाने जाहीर केलेला नाही.

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचे सहायक कार्यकारी अभियंता किरण सुब्बाराव भट्ट व कारंजी जलसिंचन योजनेचे सहायक कार्यकारी अभियंता विजयकुमार यांच्यासह परिवहन खात्याचे उपमुख्य सुरक्षा अधिकारी श्रीपती दोड्डलिंगण्णावर, चिक्‍कमंगळूरच्या उपतहसीलदार किर्ती जैन, दावणगिरी दोडाचे संयुक्‍त संचालक गोपालकृष्ण, तुमकूरचे प्रांताधिकारी तिपेस्वामी हे ते सहा अधिकारी आहेत.

एसीबीने या अधिकार्‍यांची कार्यालये निवासस्थानावर छापे घालून मालमत्ता, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करून चौैकशी सुरू केली आहे. या अधिकार्‍यांकडे त्यांच्या उत्पन्‍नाच्या शेकडो पटीने बेहिशेबी मालमत्तेचा शोध लागला आहे, अशी माहिती एसीबीचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक अलोक मोहन यांनी सांगितले. 

गोपालकृष्ण यांच्या दावणगिरीतील सिद्धरामेश्‍वर निवासस्थानी, दोडा कार्यालयावर व दावणगिरी महानगरपालिका कार्यालयावर धाडी घालून कागदपत्रांची छाननी सुरू आहे.